7500mAh बॅटरी आणि 11-इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह Lenovo Tab P11 भारतात लाँच
By सिद्धेश जाधव | Published: July 26, 2021 05:21 PM2021-07-26T17:21:40+5:302021-07-26T17:22:16+5:30
Lenovo Tab P11 Launch: Lenovo ने भारतात आपला नवीन टॅबलेट Lenovo Tab P11 सादर केला आहे. यात 11-इंचाचा मोठा डिस्प्ले आणि 7500mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.
चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Lenovo ने भारतात आपला नवीन टॅबलेट डिवायस सादर केला आहे. हा टॅबलेट Lenovo Tab P11 नावाने सादर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी हा डिवाइस जागतिक बाजारात लाँच झाला होता. लेनोवो टॅब पी11 मध्ये 11-इंचाचा मोठा डिस्प्ले मिळतो. तसेच या टॅबमध्ये Qualcomm Snapdragon 662 चिपसेट आणि 7500mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.
Lenovo Tab P11 ची किंमत
लेनोवो टॅब पी11 चा एकमेव 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेल भारतात 24,999 रुपयांमध्ये लाँच केला गेला आहे. हा टॅबलेट येत्या 5 ऑगस्टपासून शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Lenovo Tab P11 चे स्पेसिफिकेशन्स
लेनोवो टॅब पी11 मध्ये 1200 x 2000 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 11 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा टॅब 81.8 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो आणि 212पीपीआय डेन्सिटीला सपोर्ट करतो. Lenovo Tab P11 टॅबलेट अँड्रॉइड 10 ओएसवर चालतो. तसेच यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट देण्यात आला आहे. या डिवायसमध्ये 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी Lenovo Tab P11 मध्ये 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीने यात 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या टॅबलेट डिवायसमध्ये एलटीईला, ब्लूटूथ, वायफाय, 3.5एमएम जॅक आणि यूएसबी टाईप सी पोर्ट देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी लेनोवो टॅब पी11 मध्ये 7,500एमएएचची मोठी बॅटरी मिळते, जी 20वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.