सर्वात शक्तिशाली स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसरसह लेनोवो करणार टॅबलेट लाँच; गुगल प्ले लिस्टिंगमधून झाला खुलासा 

By सिद्धेश जाधव | Published: August 5, 2021 03:28 PM2021-08-05T15:28:17+5:302021-08-05T15:33:23+5:30

Lenovo Tab P12 Pro Specs: Lenovo Tab P12 Pro टॅबलेट लाँचपूर्वी Google Play Console वर लिस्ट करण्यात आला आहे. रेंडर्सनुसार या टॅबची डिजाईन Tab P11 Pro सारखी आहे.

Lenovo tab p12 pro listed on google play console ahead of launch  | सर्वात शक्तिशाली स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसरसह लेनोवो करणार टॅबलेट लाँच; गुगल प्ले लिस्टिंगमधून झाला खुलासा 

हा फोटो Lenovo Tab P11 टॅबलेटचा आहे.

googlenewsNext
ठळक मुद्दे Lenovo Tab P12 Pro टॅबलेट लाँचपूर्वी Google Play Console वर लिस्ट करण्यात आला आहे. रेंडर्सनुसार Lenovo Tab P12 Pro टॅबची डिजाईन Tab P11 Pro सारखी आहे.

Lenovo ने गेल्याच महिन्यात भारतात आपला Lenovo Tab P11 टॅबलेट लाँच केला होता. या टॅबचा प्रो व्हर्जन देखील भारतात उपलब्ध आहे. आता कंपनी आपल्या आगामी टॅबलेटवर कमी करत आहे. कंपनीच्या आगामी डिवाइस Lenovo Tab P12 Pro टॅबलेट लाँचपूर्वी Google Play Console वर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगच्या माध्यमातून Tab P12 Pro चे काही स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. तसेच हा टॅब लवकरच लाँच होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.  

Lenovo Tab P12 Pro चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

गुगल प्ले कन्सोलवर Lenovo Tab P12 Pro टॅबलेट मॉडेल नंबर TB-Q706F सह लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंगनुसार या टॅबलेटमध्ये स्नॅपड्रॅगनचा फ्लॅगशिप 888 चिपसेट देण्यात येईल. तसेच यात 8GB पर्यंतचा रॅम देखील मिळू शकतो. हा Android 11 ओएसवर चालणार टॅब असेल आणि यातील डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1600 × 2560 पिक्सल आहे. रेंडर्सनुसार Lenovo Tab P12 Pro टॅबची डिजाईन Tab P11 Pro सारखी आहे. EEC सर्टिफिकेशननुसार या टॅबमध्ये 11.5-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात येईल.  

अलीकडेच भारतातात Lenovo Tab P11 टॅबलेट लाँच करण्यात आला आहे. त्याचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेऊया.  

Lenovo Tab P11 चे स्पेसिफिकेशन्स  

लेनोवो टॅब पी11 मध्ये 1200 x 2000 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 11 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा टॅब 81.8 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो आणि 212पीपीआय डेन्सिटीला सपोर्ट करतो. Lenovo Tab P11 टॅबलेट अँड्रॉइड 10 ओएसवर चालतो. तसेच यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट देण्यात आला आहे. या डिवायसमध्ये 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते.  

फोटोग्राफीसाठी Lenovo Tab P11 मध्ये 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीने यात 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या टॅबलेट डिवायसमध्ये एलटीईला, ब्लूटूथ, वायफाय, 3.5एमएम जॅक आणि यूएसबी टाईप सी पोर्ट देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी लेनोवो टॅब पी11 मध्ये 7,500एमएएचची मोठी बॅटरी मिळते, जी 20वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

Lenovo Tab P11 ची किंमत  

लेनोवो टॅब पी11 चा एकमेव 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेल भारतात 24,999 रुपयांमध्ये लाँच केला गेला आहे. हा टॅबलेट 5 ऑगस्टपासून शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध होईल.   

Web Title: Lenovo tab p12 pro listed on google play console ahead of launch 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.