7500mAh बॅटरी आणि 11 इंचाच्या 2K डिस्प्लेसह जबरदस्त Lenovo Yoga Tab 11 लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Published: October 20, 2021 06:29 PM2021-10-20T18:29:42+5:302021-10-20T18:30:13+5:30

Lenovo Yoga Tab 11 Price In India, Sale: Lenovo Yoga Tab 11 अँड्रॉइड टॅब आहे जो 2K रिजोल्यूशन असेलल्या 11 इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो.  

Lenovo yoga tab 11 price in india rs 40000 launch with 7500mah battery helio g90t soc know details  | 7500mAh बॅटरी आणि 11 इंचाच्या 2K डिस्प्लेसह जबरदस्त Lenovo Yoga Tab 11 लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

7500mAh बॅटरी आणि 11 इंचाच्या 2K डिस्प्लेसह जबरदस्त Lenovo Yoga Tab 11 लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

googlenewsNext

चिनी कंपनी लेनोवोने एक नवीन अँड्रॉइड टॅब भारतात सादर केला आहे. हा टॅबलेट Lenovo Yoga Tab 11 नावाने ग्राहकांच्या भेटीला आहे. 7,500 mAh ची बॅटरी, मागच्या बाजूला असलेला मेटल स्टॅन्ड, 11 इंचाचा 2K रिजॉल्यूशन असलेला डिस्प्ले आणि Lenovo Precision Pen 2 stylus सपोर्ट ही वैशिष्ट्ये कंपनीने या टॅबलेटमध्ये दिली आहे.  

Lenovo Yoga Tab 11 ची किंमत 

कंपनीने Yoga Tab 11 ची किंमत 40,000 रुपये ठेवली आहे. परंतु अ‍ॅमेझॉन आणि लेनोवोच्या साईटवर हा टॅब 29,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. 4जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असलेला हा टॅब स्टॉर्म ग्रे कलरमध्ये विकत घेता येईल.  

Lenovo Yoga Tab 11 चे स्पेसिफिकेशन्स 

लेनोवो योगा टॅब 11 मध्ये 11 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले 2K (2,000x1,200 पिक्सल) रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. जो 400 निट्स ब्राईटनेस, TUV Rheinland certification आणि Dolby Vision सह सादर करण्यात आला आहे. या टॅब मध्ये Dolby Atmos सपोर्टसह JBL ट्यून क्वॉड-स्पिकर सिस्टम देण्यात आली आहे. 

या टॅबलेटमध्ये कंपनीने मीडियाटेकच्या हीलियो जी90टी प्रोसेसरचा वापर केला आहे. तसेच ARM Mali-G76 MC4 जीपीयू दिला आहे. 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येणाऱ्या या टॅबची स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येईल. हा टॅब अँड्रॉइड 11 वर चालतो. 

कनेक्टिविटीसाठी टॅबमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट, ब्लूटूथ वी5, Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac, यूएसबी ओटीजी असे पर्याय मिळतात. तसेच यात Lenovo Precision Pen 2 सपोर्ट आणि Google Kids Space असे फीचर्स देण्यात आले आहेत. या लेनोवो टॅबलेटमधील फ्रंट आणि रियर दोन्ही कॅमेरे 8 मेगापिक्सलचे आहेत. यातील 7,500 एमएएचची बॅटरी 15 तासांचा व्हिडीओ प्लेबॅक देऊ शकते. ही बॅटरी 20 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Web Title: Lenovo yoga tab 11 price in india rs 40000 launch with 7500mah battery helio g90t soc know details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.