लेनोव्होतर्फे दोन संगणक व एक बिझनेस लॅपटॉपची घोषणा
By शेखर पाटील | Published: November 20, 2017 11:45 AM2017-11-20T11:45:56+5:302017-11-20T11:54:39+5:30
लेनोव्हो कंपनीने जागतिक बाजारपेठेत आपले थिंकस्टेशन पी५२० आणि थिंकस्टेशन पी५२०सी हे दोन संगणक तसेच थिंकपॅड पी५२एस या बिझनेस लॅपटॉप उतारण्याची घोषणा केली आहे.
लेनोव्हो कंपनीने जागतिक बाजारपेठेत आपले थिंकस्टेशन पी५२० आणि थिंकस्टेशन पी५२०सी हे दोन संगणक तसेच थिंकपॅड पी५२एस या बिझनेस लॅपटॉप उतारण्याची घोषणा केली आहे.
थिंकस्टेशन मालिकेतील संगणक हे अतिशय उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असून ते वर्कस्टेशन म्हणून उपयोगात आणणे शक्य आहे. या दोन्ही डेस्कटॉप कंप्युटरमधील काही फिचर्स समान आहेत. यात प्रामुख्याने १८ कोअर इंटेल झेनॉन डब्ल्यू सेरीज या अतिशय गतीमान प्रोसेसरचा समावेश आहे. याच्या मदतीने अतिशय उच्च ग्राफीक्सयुक्त फंक्शनही यावरून अगदी सुलभपणे करता येतात. यातील थिंकस्टेशन पी५२० मॉडेलमध्ये ४ एक्स २४ जीबी इनव्हिडीया क्वाड्रो पी६००० हा जीपीयू असेल. तर थिंकस्टेशन पी५२०सी या मॉडेलमध्ये २एक्स १६ जीबी जीपीयू आहे. पहिल्या मॉडेलमधील रॅम ३२ जीबीपर्यंत तर दुसर्यातील १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. थिंकस्टेशन पी५२० मधील स्टोअरेज २५६ ती दुसर्यातील १२८ जीबी असेल.
थिंकस्टेशन पी५२० आणि थिंकस्टेशन पी५२०सी या दोन्ही मॉडेल्समध्ये विंडोज १० तसेच उबंटू लिनक्स वा सर्टीफाईड रेडहॅट लिनक्स ही प्रणाली देण्यात आलेली आहे. यातील हव्या त्या प्रणालीचा युजर वापर करू शकतो. यांच्या पुढील बाजूस ४ युएसबी ३.१ टाईप-ए, थंडरबोल्ट ३ टाईप-सी, मायक्रोफोन/हेडफोन जॅक आदी दिलेले आहेत. तर मागील बाजूस ४ युएसबी ३.१ टाईप-ए, दोन युएसबी २.०, एक गिगाबीट इथरनेट, ९-इन-१ मीडिया कार्ड रीडर/१५-इन-१ मीडिया कार्ड रीडर, ऑडिओ इनलाईन व आऊटलाईन व मायक्रोफोनचे पोर्ट असतील.
तर लेनोव्हो थिंकपॅड पी५२ एस या बिझनेस लॅपटॉपमध्येही अनेक सरस फिचर्स आहेत. यात १५.६ इंच आकारमानाचा आणि फोर-के अल्ट्रा हाय डेफिनेशन क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असेल. मात्र याच्या जोडीला हा लॅपटॉप फुल एचडी क्षमतेच्या डिस्प्लेच्या पर्यायातही ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. याच्या विविध व्हेरियंटमध्ये इंटेलच्या आठव्या पिढीतील कोअर आय-५ आणि आय-७ प्रोसेसर दिलेले आहेत. यात ३२ जीबीपर्यंतच्या रॅमचे पर्याय असून याला एनव्हिडीयाच्या क्वाड्रो पी५०० या ग्राफीक कार्डची जोड असेल. तर यात तब्बल २ जीबीपर्यंतच्या स्टोअरेजचे पर्याय देण्यात आले आहेत. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्कचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामुळे यात गतीमान इंटरनेटचा वापर करता येईल. याच्या जोडीला यात वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, युएसबी, युएसबी टाईप-सी, एचडीएमआय, थंडरबोल्ट, हेडफोन/मायक्रोफोन जॅक, डॉकींग कनेक्टर आदी सुविधा देण्यात आल्या आहेत.
लेनोव्होतर्फे अद्याप या मॉडेल्सचे मूल्य जाहीर केले नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार हे तिन्ही मॉडेल्स लवकरच भारतीय ग्राहकांना सादर करण्यात येणार आहेत.