लेनोव्हो के ८ नोट : फिचर्स, मूल्य आणि उपलब्धता

By शेखर पाटील | Published: August 9, 2017 02:22 PM2017-08-09T14:22:59+5:302017-08-09T14:23:09+5:30

लेनोव्हो कंपनीने आपले अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असणारे लेनोव्होे के ८ नोट हे मॉडेल भारतीय ग्राहकांना दोन व्हेरियंटमध्ये सादर केले असून ते ‘अमेझॉन इंडिया’वरून खरेदी करता येणार आहे.

Lenovo's Note 8: Features, Prices and Availability | लेनोव्हो के ८ नोट : फिचर्स, मूल्य आणि उपलब्धता

लेनोव्हो के ८ नोट : फिचर्स, मूल्य आणि उपलब्धता

Next

लेनोव्हो कंपनीने आपले अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असणारे लेनोव्होे के ८ नोट हे मॉडेल भारतीय ग्राहकांना दोन व्हेरियंटमध्ये सादर केले असून ते ‘अमेझॉन इंडिया’वरून खरेदी करता येणार आहे.

लेनोव्हो के ८ नोट हे मॉडेल गेल्या वर्षाच्या अखेरीस भारतात लाँच करण्यात आलेल्या के ६ नोटची पुढील आवृत्ती आहे. गेल्या काही दिवसांपासून या मॉडेलबाबत मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली होती. विशेष करून लेनोव्हो कंपनीने ‘किलर नोट’ या हॅशटॅगसह सोशल मीडियात याचा टिझर प्रदर्शीत केल्यानंतर यात उत्तमोत्तम फिचर्स असतील असे मानले जात होते. या पार्श्‍वभूमिवर आज नवी दिल्लीत लेनोव्हो कंपनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात याचे लाँचींग करण्यात आले. या मॉडेलची खासियत म्हणजे या माध्यमातून लेनोव्हो कंपनीने पहिल्यांदाच शुध्द अँड्रॉइड प्रणालीचा स्वीकार केला आहे. आजवर या कंपनीचे स्मार्टफोन अँड्रॉइडपासून विकसित करण्यात आलेल्या व्हाईब या युजर इंटरफेसवर चालत. मात्र काही दिवसांपुर्वीच लेनोव्हो कंपनीने आपण अँड्रॉइडवरच विश्‍वास टाकला असल्याचे सुचित केले होते. या अनुषंगाने लेनोव्हो के ८ नोट हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट ७.१.१ या आवृत्तीवर चालणारे असेल. तर टिझरनुसार यात जंबो बॅटरी असेल असे मानले जात होते. यावरदेखील शिक्कामोर्तब झाले असून या मॉडेलमध्ये तब्बल ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. याला टर्बो चार्ज तंत्रज्ञानाची जोड असल्यामुळे ती त्वरीत चार्ज करता येते.

उर्वरित फिचर्सचा विचार करता लेनोव्हो के ८ नोट या मॉडेलमध्ये अतिशय गतीमान असा डेका-कोअर मीडियाटेक हेलिओ एक्स २३ हा प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रोसेसर लेनोव्हो के ८ नोट या मॉडेलच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्मार्टफोनमध्ये वापरण्यात आला आहे.याची रॅम तीन/चार जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२/६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा असेल. यातील डिस्प्ले हा ५.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजेच १०८० बाय १९२० पिक्सल्स क्षमतेचा असेल. यात अपेक्षेप्रमाणे ड्युअल कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एक कॅमेरा १३ तर दुसरा ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. याच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या प्रतिमा घेता येतील. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यात छायाचित्रांना ‘बोके इफेक्ट’ प्रदान करण्याची सुविधा दिलेली आहे. यातील १३ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍या प्युअरसेल प्लस हा सेन्सर प्रदान करण्यात आला असून याच्या मदतीने चांगले छायाचित्र घेता येतील. तर या मॉडेलमध्ये एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून यात ‘प्रो-मोड’ व ‘ब्युटी मोड’ देण्यात आले आहेत. तर वाईड अँगल असल्यामुळे याच्या मदतीने मोठ्या क्षेत्रफळाच्या आकारात सेल्फी घेता येते.

लेनोव्हो के ८ नोट हे मॉडेल वॉटरप्रूफ आहे. यात डॉल्बी अ‍ॅटमॉस ही प्रणाली देण्यात आली असून याच्या मदतीने अतिशय दर्जेदार ध्वनीची अनुभुती घेता येत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच यात ‘थिएटर मॅक्स’ प्रणालीदेखील दिलेली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या मॉडेलमध्ये स्वतंत्र ‘म्युझिक की’ देण्यात आली आहे. याला दाब देऊन म्युझिक प्ले/पॉज करण्याची सुविधा असेल. यावर दोनदा दाब देऊन फॉरवर्ड तर तीनदा प्रेस करून रिवाइंड करण्याची सुविधा असेल. लेनोव्हो के ८ नोट या मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट असेल. याशिवाय यात फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील प्रदान करण्यात आले आहे.

लेनोव्हो के ८ नोटच्या तीन जीबी रॅम व ३२ जीबी स्टोअरेज असणार्‍या व्हेरियंटचे मूल्य १२,९९९ तर चार जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज असणार्‍या व्हेरियंटचे मूल्य १३,९९९ रूपये असेल. हे दोन्ही व्हेरियंट ‘अमेझॉन इंडिया’ या शॉपींग पोर्टलवरून १८ ऑगस्टपासून ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. यासोबत काही खास ऑफर्सदेखील देण्यात आल्या आहेत. यात अमेझॉनच्या डिलवरून ई-बुक खरेदी करणार्‍यांना (३०० रूपयांपर्यंत) ८० टक्के सवलत प्रदान करण्यात आली आहे. आयडियाने यासोबत ३४३ रूपयांच्या रिचार्जमध्ये ६४ जीबी मोफत डेटा आणि ५६ दिवसांपर्यंत अमर्याद कॉलचा प्लॅन सादर केला आहे. तर या मॉडेलसोबत १५९९ रूपयांचे मोटो स्पोर्टस् हेडफोन फक्त ६९९ रूपये मूल्यात मिळणार आहेत.

Web Title: Lenovo's Note 8: Features, Prices and Availability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.