6 हजारांत iPhone 13 सारखा स्मार्टफोन; मिळतेय 256GB मेमरी
By सिद्धेश जाधव | Published: June 1, 2022 12:52 PM2022-06-01T12:52:59+5:302022-06-01T12:53:29+5:30
LeTV Y1 Pro स्मार्टफोनची डिजाईन iPhone 13 सारखी ठेवण्यात आली आहे. फोनमध्ये 4GB RAM, 256GB स्टोरेज, 4000mAh ची बॅटरी मिळते.
LeTv हे नाव खूप कमी टेक प्रेमींच्या लक्षात असेल. 2016 मध्ये कंपनीनं भारतात आपला पहिला स्मार्टफोन LeEco Le 1s लाँच केला होता. कमी किंमतीत फ्लॅगशिप स्पेक्स देणारी कंपनी म्हणून अनेकांनी हे फोन्स विकत घेतले होते. सध्या कंपनीनं भारतातील कारभार बंद केला आहे. परंतु चीनमध्ये कंपनीनं iPhone 13 सारखा दिसणारा LeTV Y1 Pro नावाचा हँडसेट बजेट सेगमेंटमध्ये सादर केला आहे.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
फोनमध्ये 6.5 इंचाचा LCD HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन 4 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनमध्ये Unisoc T310 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 ओएसवर चालतो. यात फेस अनलॉक फीचर देण्यात आलं आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी यूएसबी टाइप-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक असे ऑप्शन मिळतात.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरा देण्यात आले आहेत. यात 8 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह एक AI कॅमेरा मिळतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये कंपनीनं 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. पावर बॅकअपसाठी यात 4000mAh ची बॅटरी मिळते. जी 10 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
किंमत
LeTV Y1 Pro स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम व 32 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 499 युआन (सुमारे 5,800 रुपये) आणि 4 जीबी रॅम व 128 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 699 युआन (सुमारे 8,510 रुपये) आहे. तर 4 जीबी रॅम व 256 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला टॉप व्हेरिएंट 899 युआन (सुमारे 10,500 रुपये) मध्ये विकत घेता येईल.