विद्यार्थ्यांसाठी स्वस्त लॅपटॉप; पाणी पडल्यावरही चालेल 'हा' LG चा दमदार लॅपटॉप
By सिद्धेश जाधव | Published: March 8, 2022 07:24 PM2022-03-08T19:24:21+5:302022-03-09T11:10:33+5:30
LG 11TC50Q Chromebook एक क्लाउड-बेस्ड 2-इन-1 लॅपटॉप आहे. 11.6 इंचाच्या या टच लॅपटॉपची खासियत म्हणजे यात IP41 वॉटर रेजिस्टन्स देण्यात आला आहे.
LG नं विद्यार्थ्यांचा विचार करून स्वस्त आणि मस्त लॅपटॉप बाजारात लाँच केला आहे. कंपनीनं आपल्या होम मार्केट दक्षिण कोरियामध्ये 360 डिग्री फिरणारा क्रोमबुक उतरवला आहे. LG 11TC50Q Chromebook एक क्लाउड-बेस्ड 2-इन-1 लॅपटॉप आहे. 11.6 इंचाच्या या टच लॅपटॉपची खासियत म्हणजे यात IP41 वॉटर रेजिस्टन्स देण्यात आला आहे. त्यामुळे यावर व्हर्टिकली पडणाऱ्या पाण्यापासून संरक्षण होते.
LG 11TC50Q Chromebook चे स्पेसिफिकेशन्स
LG 11TC50Q Chromebook मध्ये 11.6 इंचाचा एचडी (1366x768 पिक्सल) एलसीडी टच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 360 डिग्री फिरवून याचा वापर टॅबलेट प्रमाणे देखील करता येतो. कंपनीनं यात इंटेल सेलेरॉन एन5100 सीपीयूचा वापर केला आहे, सोबत इंटेल यूएचडी ग्राफिक्स मिळतात. कंपनीनं 4GB LPDDR4x RAM आणि 64GB eMMC स्टोरेज मिळते.
LG 11TC50Q क्रोमबुकमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय 6, ब्लूटूथ, एक 3.5 मिमी हेडफोन जॅक, दोन यूएसबी टाइप-सी 3.2 जेन 1 पोर्ट, दोन यूएसबी टाइप-ए 3.2 जेन 1 पोर्ट, यूएसबी पावर डिलिव्हरी आणि एक मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. या क्रोमबुकमध्ये 1-मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग वेब कॅमेरा आणि 5-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळतो. यात 2W स्टीरियो स्पिकर सेटअप आहे. या क्रोमबुकमधील 44.5Whr ची बॅटरी आहे 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करती आहे.
LG 11TC50Q Chromebook ची किंमत
LG 11TC50Q क्रोमबुकची किंमत KRW 559,000 (जवळपास 34,800 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा लॅपटॉप ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये 7 मार्चपासून विकत घेता येईल. या लॅपटॉपच्या भारतीय लाँचची मात्र कोणतीही माहिती मिळाली नाही.
हे देखील वाचा:
- स्वस्तात फ्लॅगशिप अनुभव; 6 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह iQOO चा जबरदस्त स्मार्टफोन
- सिंगल चार्जवर 10 दिवस चालणारे दमदार Earbuds; इतक्या स्वस्तात दमदार साउंड आणि फास्ट चार्जिंग
- Free Fire MAX मध्ये असे मोफत मिळवा Diamond Royale Voucher; आता अनेक रिवॉर्ड्सही फ्री