काय सांगता! 325 इंचाचा अवाढव्य टीव्ही देणार घरबसल्या चित्रपटगृहाचा अनुभव; जाणून घ्या LG DVLED चे स्पेसिफिकेशन्स
By सिद्धेश जाधव | Published: September 15, 2021 06:39 PM2021-09-15T18:39:01+5:302021-09-15T18:39:19+5:30
LG ने नवीन टीव्ही रेंज सादर केली आहे, यात 81 ते 325 इंचाच्या मॉडेल्सचा समावेश करण्यात आला आहे.
दक्षिण कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी LG ने एक नवीन LED TV लाँच केला आहे. या टीव्हीचा आकारच याची खासियत आहे, कारण कंपनीने 325 इंचाचा टीव्ही मॉडेल सादर केला आहे. घरबसल्या चित्रपटगृहाचा अनुभव देण्यासाठी कंपनीने LG DVLED (डायरेक्ट व्यू एलईडी) टीव्ही डिजाईन केली आहे. कंपनीची ही सीरिज सॅमसंगच्या ‘द वॉल टीव्ही’ ला चांगलेच आव्हान देईल असे दिसत आहे.
कंपनी नवीन होम सिनेमा टीव्ही सीरीजला ‘होम थिएटर डिस्प्लेमधील सुपरकार’ म्हणत आहे. LG होम सिनेमा रेंजमध्ये ग्राहकांना टॉप क्लास सिनेमा अनुभव देण्यासाठी 2K, 4K आणि 8K कॉन्फिगरेशन उपलब्ध आहेत. तसेच या सीरिजमधील टीव्हीची स्क्रीन साईज 81-इंचापासून सुरु होते. 325-इंचाचा मॉडेल हा या सीरिजमधील सर्वात मोठा मॉडेल आहे. याआधी देखील या स्क्रीन साईजचे टीव्ही कंपनी बनवत होती परंतु ते मॉडेल्स फक्त व्यवसायिक ग्राहकांसाठी उपलब्ध होते.
या टीव्ही रेंज मध्ये LG च्या Dual2K आणि Dual4K UltraStretch टेक्नॉलॉजीच्या मदतीने साइड-बाय-साइड 32:9 रेशियो मिळवता येईल. म्हणजे तुम्ही एकावेळी दोन व्हिडीओ त्याच क्वॉलिटीसह बघू शकता. तसेच रेशियो आणि मोठ्या स्क्रीन साईजमुळे यात 160-डिग्री व्यूइंग अँगल मिळतो. या रेंजचे सर्व डिस्प्ले कनेक्टेड हाय-रिजोल्यूशन व्हिडीओ सोर्स, बिल्ट-इन मीडिया प्लेयर्स किंवा अटॅच स्ट्रीमिंग डिवाइसेससह येतात. यात स्मूद कंटेंट प्लेबॅकसाठी क्वॉड-कोर वेबओएस इंटरफेस मिळतो. रिमोट देखील खास कंटेंट स्ट्रीमर्ससाठी डिजाइन करण्यात आला आहे.
LG ची होम सिनेमा टीव्ही रेंज कस्टम ऑर्डरद्वारे विकत घेता येईल. त्यामुळे कंपनीने कोणतीही किंमत सांगितलेली नाही. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार 325 इंचाच्या मॉडेलची किंमत 1.7 दशलक्ष डॉलर्स पर्यंत जाऊ शकते. हा अवाढव्य टीव्ही कंपनी एका खास केसिंगमध्ये डिलिव्हर करेल. या टीव्ही सोबत WebOS स्मार्ट टीव्ही डिवाइस, 5 वर्षांची एक्सटेंडेड केयर वॉरंटी, 3 वर्षांची टोटल केयर हेल्थ चेक आणि कनेक्टेड केयरचे 3 वर्षांचे सब्सक्रिप्शन देखील मिळेल.