एलजीचा नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोन : दणदणीत फिचर्सचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 04:58 PM2018-08-07T16:58:16+5:302018-08-07T16:58:27+5:30
LG G7 Plus ThinQue Feature : एलजी जी७ प्लस थिनक्यू हा नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आला असून यामध्ये अतिशय सरस फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
एलजी जी७ प्लस थिनक्यू हा नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आला असून यामध्ये अतिशय सरस फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
एलजी कंपनीने या वर्षी मे महिन्यात जी७ थिनक्यू हा स्मार्टफोन बाजारपेठेत लाँच केला होता. आता याचीच पुढील आवृत्ती एलजी जी७ प्लस थिनक्यू या मॉडेलच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आली आहे. याचे मूल्य ३९,९९० रूपये असून १० ऑगस्टपासून फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून याला उपलब्ध करण्यात येणार आहे.
एलजी जी७ प्लस थिनक्यू या मॉडेलमध्ये ६.१ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी प्लस म्हणजे ३१२० बाय १४४० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले १५:५:९ या अस्पेक्ट रेशोने युक्त असून याच्या वरील बाजूस आयफोन एक्स या मॉडेलप्रमाणे नॉच देण्यात आलेला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा अतिशय गतीमान असा स्नॅपड्रॅगन ८४५ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम ६ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये डीटीएस :एक्स आणि हाय-फाय क्वॉड डीएसी या प्रणालींचा सपोर्ट आहे. यामुळे यात अतिशय उच्च दर्जाच्या ध्वनीची अनुभूती घेता येत असल्याचा कंपनीने दावा केला आहे. तसेच यात सुपर फार फिल्ड व्हॉइस रिकग्नेशन आणि अतिशय संवेदनशील असा मायक्रोफोन देण्यात आला आहे. यामुळे यात अगदी पाच मीटर अंतरावरूनही ध्वनी आज्ञावली (व्हाईस कमांड) देता येत असल्याचे एलजीने नमूद केले आहे. यामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर असून फेस अनलॉकची सुविधादेखील देण्यात आली आहे.
एलजी जी७ थिनक्यू प्लस या स्मार्टफोनच्या मागील बाजूस १६ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आले असून यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यात वायरलेस चार्जींगच्या सुविधेने युक्त असणारी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारे आहे. हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ असल्यामुळे याला कोणत्याही विषम वातावरणात वापरणे शक्य आहे.