LG इलेक्ट्रॉनिक्सची 6G ची चाचणी यशस्वी; कंपनीने केला टेराहर्ट्ज (THz) स्पेक्ट्रमचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 15:11 IST2021-08-21T15:11:16+5:302021-08-21T15:11:25+5:30
LG 6G THz Test: दक्षिण कोरियन कंपनी आता 6G च्या चाचण्या करत आहेत. LG ने 6G ची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केल्याची घोषणा केली आहे.

LG इलेक्ट्रॉनिक्सची 6G ची चाचणी यशस्वी; कंपनीने केला टेराहर्ट्ज (THz) स्पेक्ट्रमचा वापर
भारतात 5G टेक्नॉलॉजीचा उदय अजूनही दृष्टीक्षेपात आला नाही. आता कुठे Reliance jio, Airtel आणि Vodafone Idea सारख्या टेलिकॉम कंपन्यांनी 5जीच्या चाचण्या सुरु केल्या आहेत. या चाचण्या जरी यशस्वी झाल्या असल्या तरी, 5G नेटवर्कचा विस्तार देशभर होण्यास बराच वेळ लागू शकतो. परंतु दक्षिण कोरियन कंपनी आता 6G च्या चाचण्या करत आहेत. LG ने 6G ची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केल्याची घोषणा केली आहे.
एलजी आणि फ्रॉनहॉफर-गेसेलशॉफ्ट यांनी एकत्रत येऊन जर्मनीमधील बर्लिन शहरात wireless 6G terahertz ची यशस्वी चाचणी केली आहे. या टेस्टमध्ये टेराहर्ट्ज (THz) स्पेक्ट्रमचा वापर करून Fraunhofer Heinrich Hertz Institute (HHI) आणि Berlin Institute of Technology दरम्यान डेटा ट्रान्सफर करण्यात आला आहे. ही टेस्ट प्रयोगशाळेत करण्यात आली नसून 100 मीटर अंतरावर असलेल्या दोन इमारतींमध्ये करण्यात आली आहे.
या चाचणीत 6G THz टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. या टेक्नॉलॉजीची रेंज वाढवण्याची पावर ऍम्प्लिफायरची निर्मिती करण्यात आली होती. हे ऍम्प्लिफायर अल्ट्रा-वाईड फ्रिक्वेंसीवर देखील सिग्नल स्थिर ठेवतात. 6G चा वापर ऑगमेंटेड रिअलिटी, व्हर्च्युअल रिअलिटी आणि मिक्स्ड रिअलिटीसाठी खूप महत्वाचा ठरू शकतो. यामुळे मनोरंजन, आरोग्य, विज्ञान, शिक्षण आणि उत्पादन क्षेत्रांमध्ये प्रगती करता येईल.