अरे वा! आता इयरबड्समुळे कानात बॅक्टेरिया नाही जाणार; यूव्ही टेक्नॉलॉजीसह LG Tone Free इयरबड्स लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 05:40 PM2021-07-03T17:40:18+5:302021-07-03T17:43:04+5:30
LG Tone Free DFP8W ची किंमत 179 युरो (सुमारे 15,900 रुपये) आहे.
एलजीने LG Tone Free DFP8W ट्रू वायरलेस स्टिरियो (TWS) इयरबड्स लाँच केले आहेत. हे इयरबड्स अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) आणि 24 तासांपर्यतच्या बॅटरी बॅकअपसह सादर करण्यात आले आहेत. या इयरबड्सची खासियत म्हणजे यांच्यासोबत मिळणारी चार्जिंग केस. या चार्जिंग केस मध्ये UVnano टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जी इयरबड्सवरील 99.9 टक्के जिवाणू फक्त पाच मिनिटांत मारू शकते. (LG launches Tone Free DFP8W TWS earbuds with Active Noise Cancellation)
LG Tone Free DFP8W स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
LG Tone Free DFP8W मध्ये 8mm डायनॅमिक ड्रायव्हर देण्यात आला आहे. यात देण्यात आलेल्या तीन माईक पैकी दोनचा वापर कॉल्स करताना केला जातो तर तिसरा माईक अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनसाठी वापरला जातो. या बड्स मध्ये अॅम्बिएन्ट आणि चॅट असे दोन साऊंड मोडस आहेत. यात IPX4 वॉटर आणि स्वेट रेजिस्टन्स देण्यात आला आहे. सोबत मेडिकल ग्रेड इयरटीप्स देखील मिळतात.
LG Tone Free DFP8W मध्ये ब्लूटूथ 5.2, गुगल फास्ट पेरींग आणि विंडोज स्विफ्ट पेयर प्रोटोकॉल सपोर्ट देण्यात आला आहे. यातील गेम मोडमुळे लेटन्सी कमी होते. यात टच कंट्रोल्स देखील देण्यात आले आहेत. हे इयरबड्स अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनविना 10 तासांचा बॅटरी बॅकअप देतात. तर केसमध्ये 14 तासांचा अतिरिक्त बॅटरी बॅकअप मिळतो.
LG च्या इयरबड्स सोबत मिळणारी चार्जिंग केस यूएसबी टाईप सी वायर्ड चार्जिंग सोबतच वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच यातील यूव्ही टेक्नॉलॉजी इयरबड्सवरील जिवाणू आणि जंतू मारून टाकते, असा दावा कंपनीने केला आहे.
LG Tone Free DFP8W ची किंमत
LG Tone Free DFP8W ची किंमत 179 युरो (सुमारे 15,900 रुपये) ठेवण्यात आली आहे. हे इयरबड्स एलजी जर्मनीच्या वेबसाईटवर लिस्ट करण्यात आले आहेत. हे बड्स Charcoal Black, Haze Gold, आणि Pearl White रंगात उपलब्ध होतील.