भन्नाट! चार्जिंग केसमध्ये ठेवताच सॅनिटाईज होतील ‘हे’ इयरबड्स, करणार 99.9 टक्के जंतूंचा खात्मा
By सिद्धेश जाधव | Published: March 16, 2022 06:19 PM2022-03-16T18:19:54+5:302022-03-16T18:22:07+5:30
इयरबड्सचा संबंध कानासारख्या नाजूक अवयवाशी येत असताना सुद्धा अनेकदा इयरबड्सच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जातं.
LG नं भारतात आज LG ToneFree FP9 इयरबड्स सादर केले आहेत. या इयरबड्स सोबत मिळणारी चार्जिंग केस अन्य इयरबड्स सारखी नाही. यात यूव्ही नॅनो चार्जिंग केस मिळते जी अल्ट्रा व्हायोलेट लाईटच्या मदतीनं इयरबड्सवरील 99.9 टक्के बॅक्टेरियाला मारून टाकते. त्यामुळे युजरला फुल्ली सॅनिटाईज्ड इयरबड्स वापरता येतात. इयरबड्सचा संबंध कानासारख्या नाजूक अवयवाशी येत असताना सुद्धा अनेकदा इयरबड्सच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जातं. LG ToneFree FP9 ची किंमत 13,990 रुपये आहे.
LG ToneFree FP9 चे स्पेसिफिकेशन्स
LG ToneFree FP9 मध्ये अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) फिचर देण्यात आलं आहे. हे फिचर रोजच्या आयुष्यातील हाय फ्रिक्वेन्सी नॉइज कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतं. यातील एन्हान्सड ANC बाहेरील आवाज तेवढाच अँटी नॉइज निर्माण करून ब्लॉक करतं. सुधारित ड्रायव्हर नॉइज डिटेक्ट करून कॅन्सल करू शकतात, त्यामुळे संगीतात हरवून जाता येतं, असा दावा कंपनीनं केला आहे.
हे इयरबड्स तीन वेगवेगळ्या आकाराच्या मेडिकल ग्रेड सिलिकन इयर जेलसह येतात. जे हायपोअॅलर्जिक असून त्वचेला जास्त त्रासदायक ठरत नाहीत. LG Tone App मध्ये एक फायन्डर टूल देण्यात आला आहे. या टूलच्या मदतीनं तुम्ही तुमचे इयरबड्स शोधू शकता. म्हणजे हे इयरबड्स कुठेही हरवण्याचा प्रश्न येत नाही.
हे इयरबड्स IPX4 वॉटर रेजिस्टन्ससह येतात. त्यामुळे पाऊस, घाम इत्यादींपासून यांचं संरक्षण होतं. हे बड्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतात आणि चार्जिंग केससह 24 तासांचा प्ले बॅक टाइम देतात. कनेक्टिव्हिटीसाठी यात Bluetooth 5.2 टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.