व्हॉट्सअॅपची 'ही' लिंक ठरू शकते घातक, चुकून पण करू नका 'या' गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 10:55 AM2018-08-08T10:55:05+5:302018-08-08T12:12:50+5:30
व्हॉट्सअॅपचा जास्त वापर करत असाल तर जरा सावधान कारण ते तुमच्यासाठी घातक ठरू शकतं.
नवी दिल्ली - व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं एक उत्तम आणि प्रभावी माध्यम असून जगभरात सर्वाधिक वापरण्यात येणारे चॅटिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपच्या लोकप्रियतेमुळेच व्हॉट्सअॅपही युजर्सला नेहमीच नवनवीन फिचर्सची सेवा उपलब्ध करून देत असतं. मात्र तुम्ही जर व्हॉट्सअॅपचा जास्त वापर करत असाल तर जरा सावधान कारण ते तुमच्यासाठी घातक ठरू शकतं.
व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या एखादी लिंक अथवा फोटोच्या माध्यमातून तुमची माहिती लीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कोणत्याही अनोळखी नंबरवरून एखादा मॅसेज आल्यास त्यामध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करण्याआधी थोडा विचार करा. सोशल मीडिया आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून लोक स्मार्ट झालेत. मात्र सायबर क्राईमचा धोकाही वाढला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या सक्रीय यूजर्सची माहिती ट्रेस करणं आता तंत्रज्ञानामुळे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर करताना सजग असणं गरजेचं आहे.
असा निर्माण होतो लिंकमुळे धोका
- एखादा स्टॉकर किंवा सायबर गुन्हेगार हा अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअॅपवर मॅसेज करतो. त्या मॅसेजमध्ये एक लिंक देण्यात आलेली असते. या लिंकवर क्लिक केल्यास तुम्ही स्टॉकरच्या जाळ्यात फसू शकता.
- ही लिंक दिसताना गूगल लिंकप्रमाणेच दिसते. तसेच या लिंकमध्ये एखाद्या बॉलिवूड कलाकाराचा फोटो अथवा सरकारच्या योजनेबाबत माहिती दिलेली असते. त्यामुळे लोक त्याविषयीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करतात.
- लिंकवर क्लिक केल्यानंतर कोणताही एखादा फनी फोटो किंवा क्लिप ओपन होते. तुम्ही हा मॅसेज त डीलीट करा किंवा नाही. त्याआधी तुमच्या लोकेशनची माहिती ही स्टॉकरला समजते.
- स्टॉकर आयपी लॉगर क्लाइंटच्या माध्यमातून मल्टीमीडिया फाईलची एक लिंक तयार करतो.
- तयार करण्यात आलेली लिंक ही मॅसेजच्या माध्यमातून पाठवली जाते. ही आकर्षक असल्याने तुम्ही या लिंकवर क्लिक करता. त्यामुळे स्टॉकरकडे तुमचा आयपी अॅड्रेस पोहोचतो.
- याच पद्धतीने स्टॉकर तुमची वैयक्तिक माहिती मिळवू शकतो. तुमचं गाव, तुमच्या आसपास असलेले मोबाईल टॉवर यासारख्या अनेक गोष्टींची माहिती स्टॉकरला मिळवणं सहज शक्य असतं. त्यामुळेच तुमच्या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक असते.