लिंक्डइनचे भारतात ५ कोटी युजर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 05:55 PM2018-07-17T17:55:33+5:302018-07-17T17:55:52+5:30

आघाडीचे प्रोफेशनल सोशल नेटवर्क म्हणून ख्यात असणार्‍या लिंक्डइनचे भारतात आता ५ कोटी युजर्स असल्याची माहिती आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.

LinkedIn has 5 million users in India | लिंक्डइनचे भारतात ५ कोटी युजर्स

लिंक्डइनचे भारतात ५ कोटी युजर्स

Next

आघाडीचे प्रोफेशनल सोशल नेटवर्क म्हणून ख्यात असणार्‍या लिंक्डइनचे भारतात आता ५ कोटी युजर्स असल्याची माहिती आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.

२००२ साली स्थापन करण्यात आलेले लिंक्डइन हे प्रोफेशनल सोशल नेटवर्क जगभरात विख्यात आहे. याचा जगभरातील बहुतांश कंपन्या आणि विविध क्षेत्रांमधील प्रोफेशनल्स वापर करत आहेत. लिंक्डइन साईटचे सुमारे ५६ कोटींपेक्षा जास्त युजर्स आहेत. तर याच्या संकेतस्थळाची अलेक्झा रँक ३४ इतकी आहे. जून २०१६ मध्ये मायक्रोसाॅफ्टने तब्बल २६.२ अब्ज डॉलर्स इतके मूल्य मोजून लिंक्डइनची खरेदी केली होती. फेसबुकने व्हाटसअ‍ॅपला २२ अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतले होते. याचा विचार करता लिंक्डइनची खरेदी हा याच्यापेक्षाही मोठा व्यवहार ठरला होता. या सोशल नेटवर्कची मायक्रोसॉफ्टकडे मालकी आल्यानंतर यात अनेक अनुकुल बदल करण्यात आले. याचा युजर इंटरफेस बदलण्यात आला. यावर नवनवीन फिचर्स देण्यात आले. यामुळे युजर्सची याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. यामुळेच हे जगातील आघाडीचे करियर केंद्रीत सोशल नेटवर्क बनले आहे. लिंक्डइनला टक्कर देण्याचा फेसबुक व गुगलसह अन्य कंपन्यांनी प्रयत्न केला असला तरी यात अद्याप तरी त्यांना यश लाभल्याचे दिसून आलेले नाही. या पार्श्‍वभूमिवर, आता भारतात लिंक्डइनने ५ कोटी युजर्सचा महत्वाचा टप्पा पार केल्याची माहिती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.

लिंक्डइनने भारतात २००९ साली कामकाज सुरू केले. २०११ मध्ये या नेटवर्कने एक कोटींचा टप्पा ओलांडला होता. २०१४ साली अडीच कोटी युजर्स झाले. तर यानंतर आता पाच कोटी युजर्सचा आकडा गाठण्यात आल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. लिंक्डइन हे सोशल नेटवर्क कर्मचारी आणि नियोक्ता यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून काम पाहते. यामुळे विविध प्रोफेशनल्ससह कंपन्यांना हे सोशल नेटवर्क भावले आहे. दरम्यान, यात खास भारतीय युजर्ससाठी काही नवीन फिचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत. याशिवाय, भारतीय युजर्ससाठी या अ‍ॅपची लाईट आवृत्तीसुध्दा लाँच करण्यात आलेली आहे.

Web Title: LinkedIn has 5 million users in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.