स्कॅमर्सनी LinkedIn ला बनवला 'अड्डा'; नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक, 'असा' घालतात गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 10:22 AM2023-02-28T10:22:41+5:302023-02-28T10:25:53+5:30

स्कॅमर्सना फसवणूक करण्याचा नवीन मार्ग सापडला आहे. LinkedIn ला त्यांनी आता आपला अड्डा बनवलं असून तिथून ते लोकांची मोठी फसवणूक करत आहेत.

linkedin new job scam people are being cheated by giving the greed of job | स्कॅमर्सनी LinkedIn ला बनवला 'अड्डा'; नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक, 'असा' घालतात गंडा

स्कॅमर्सनी LinkedIn ला बनवला 'अड्डा'; नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक, 'असा' घालतात गंडा

googlenewsNext

अनेक टेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येत आहे, त्यामुळे स्कॅमर्सना फसवणूक करण्याचा नवीन मार्ग सापडला आहे. LinkedIn ला त्यांनी आता आपला अड्डा बनवलं असून तिथून ते लोकांची मोठी फसवणूक करत आहेत. लोकांना अस्तित्त्वात नसलेल्या नोकऱ्या देऊन गंडा घालत आहेत. फायनान्शियल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या लिंक्डइनवर इम्प्लोयर असल्याचे भासवून स्कॅमर्सकडून खोटी भरती केली जात आहे.

फसवणुकीमध्ये नक्कीच वाढ झाली आहे असं लिंक्डइनचे उत्पादन व्यवस्थापनाचे उपाध्यक्ष ऑस्कर रोड्रिग्ज यांनी एका अहवालात म्हटले आहे. अलिकडच्या काही महिन्यांत प्लॅटफॉर्मने लाखो बनावट खाती ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला आहे, कारण रेगुलेटर्सने नोकरीशी संबंधित फसवणुकीत वाढ होण्याचा इशारा दिला आहे.

सायबर सिक्युरिटी कंपनी जेडस्केलरने अलीकडेच एका फसवणुकीचे वर्णन केले आहे जे नोकरी शोधणार्‍यांना लक्ष्य करते, जेथे फसवणूक करणारे लोक LinkedIn च्या डायरेक्ट मेसेजिंग फीचरद्वारे संपर्क साधतात. "त्यांनी कंपन्यांना मुलाखती घेण्यास सांगणाऱ्या खऱ्या रिक्रूटर्सच्या चित्रांसह स्काईप प्रोफाइलही तयार केले," असे जस्केलरचे सुरक्षा संशोधनाचे उपाध्यक्ष दीपेन देसाई यांनी म्हटलं आहे. 

फसवणूक करणारे आता आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा (AI) वापर करून लोकांना सहज फसवू शकतील असे प्रोफाइल फोटो तयार करत आहेत. यूएस फेडरल ट्रेड कमिशन (FTC) ने अलीकडेच सांगितले की 2022 मध्ये 92,000 पेक्षा जास्त नोकरी-संबंधित आणि व्यवसाय घोटाळे झाले आहेत, ज्यात 367.4 मिलियन डॉलरच्या चोरीची नोंद झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: linkedin new job scam people are being cheated by giving the greed of job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी