चिनी कंपन्यांचे फोन फेकून द्या; युरोपियन सरकारने दिला नागरिकांना इशारा  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 07:27 PM2021-09-24T19:27:39+5:302021-09-24T19:37:12+5:30

Lithuania on Chinese smartphones: लिथुआनियाच्या संरक्षण मंत्र्यांनी नवीन चिनी फोन विकत न घेण्याचा आणि वापरात असलेले स्मार्टफोन्स शक्य तितक्या लवकरच फेकून देण्याचा सल्ला दिला आहे.  

Lithuania urges citizens to throw away chinese smartphones  | चिनी कंपन्यांचे फोन फेकून द्या; युरोपियन सरकारने दिला नागरिकांना इशारा  

चिनी कंपन्यांचे फोन फेकून द्या; युरोपियन सरकारने दिला नागरिकांना इशारा  

Next

लिथुआनिया सरकारने आपल्या नागरिकांना चिनी कंपन्यांचे स्मार्टफोन न वापरण्याचा इशारा दिला आहे. चिनी ब्रँडचे स्मार्टफोन वापरत असल्यास ते त्वरित फेकून द्या असा सल्ला लिथुआनियाच्या संरक्षण मंत्रालयाने नागरिकांना दिला आहे. लिथुआनियाच्या नॅशनल सायबर सिक्योरिटी सेंटरने चिनी कंपन्या स्मार्टफोनमधून हेरगिरी करत असल्याचे म्हटले आहे.  

चिनी स्मार्टफोन ब्रँड Xiaomi के फोनमध्ये सेन्सरशिप टूल्सचा वापर करत आहे. हे फोन्स काही शब्द सेन्सर करत आहेत. यात Huawei च्या स्मार्टफोन्सचा देखील समावेश आहे, असे लिथुआनिया नॅशनल सायबर सिक्योरिटी सेंटरने सांगितले आहे. लिथुआनियाच्या संरक्षण मंत्र्यांनी नवीन चिनी फोन विकत न घेण्याचा आणि वापरात असलेले स्मार्टफोन्स शक्य तितक्या लवकरच फेकून देण्याचा सल्ला दिला आहे.  

स्मार्टफोनमधील सेन्सरशिप  

लिथुआनिया सायबर सिक्युरिटी सेंटरने केलेल्या तपासणीनुसार,  Mi 10T 5G स्मार्टफोन Free Tibet, long live taiwan independence, democracy movement इत्यादी 449 शब्दांचा स्वीकार करत नाही. फोनमधील सॉफ्टवेयर हे शब्द डिलीट करतो. तसेच शाओमी फोनच्या युजर्सचा डेटा सिंगापूर सर्वरवर पाठवला जातो.  

याबाबत शाओमीने आणि हुवावेने स्पष्टीकरण दिले आहे. शाओमीने आपल्या स्मार्टफोन्समध्ये कोणतेही सेन्सारशिप टूल नाही, असे सांगितले आहे. तर हुवावेने देखील युजर्सची माहिती दुसरीकडे पाठवण्याचा आरोप फेटाळून लावला आहे. हे आरोप सिद्ध झाल्यास चिनी कंपन्यांना मोठे नुकसान होऊ शकते. या कंपन्यांवर बंदी देखील घातली जाऊ शकते.  

Web Title: Lithuania urges citizens to throw away chinese smartphones 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.