शाब्बास पोरी! चिमुकलीने केली Google ची मदत, हटवले कोट्यवधींची कमाई करणारे स्कॅम अ‍ॅप्स

By सायली शिर्के | Published: September 24, 2020 08:43 AM2020-09-24T08:43:03+5:302020-09-24T08:43:47+5:30

स्कॅम अ‍ॅप्सचा शोध घेण्यासाठी एका चिमुकलीने सिक्योरिटी रिसर्चर्सची मदत केली आहे. सर्च इंजिन कंपनीने या अ‍ॅप्सना आता हटवलं आहे.

little girl helped google in removing scam apps whic were targeting kids and making money | शाब्बास पोरी! चिमुकलीने केली Google ची मदत, हटवले कोट्यवधींची कमाई करणारे स्कॅम अ‍ॅप्स

शाब्बास पोरी! चिमुकलीने केली Google ची मदत, हटवले कोट्यवधींची कमाई करणारे स्कॅम अ‍ॅप्स

googlenewsNext

नवी दिल्ली - गुगल प्ले स्टोरवरून 17 धोकादायक अ‍ॅप्स हटवण्यात आले आहेत. हे अ‍ॅप्स मेलवेयर इन्फेक्टेड होते. आता गुगलवर हे 17 अ‍ॅप्स उपलब्ध नाहीत. गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपल स्टोरवर उपलब्ध असलेले अनेक अ‍ॅप्स हे सिक्योरिटी चेकमधून जात आहेत. मात्र असे असले तरी स्कॅमर अनेक अ‍ॅप्सच्या मदतीने युजर्संना नुकसान पोहोचवते. प्ले स्टोर आणि अ‍ॅप स्टोरवरून 24 लाखांहून जास्त डाऊनलोड झालेल्या अ‍ॅप्सची माहिती उघड झाली आहे. हे छोट्या मुलांना लक्ष्य करीत होते. विशेष म्हणजे स्कॅम अ‍ॅप्सचा शोध घेण्यासाठी एका चिमुकलीने सिक्योरिटी रिसर्चर्सची मदत केली आहे. सर्च इंजिन कंपनीने या अ‍ॅप्सना आता हटवलं आहे.

चेक रिपब्लिकच्या प्रॉगमध्ये राहणाऱ्या या छोट्या युजरने सात अ‍ॅप्सची माहिती उघड करून गुगलला मोठी मदत केली आहे. अटॅकर्सने स्कॅम करून 500,000 डॉलर (जवळपास 3.7 कोटी रुपये) कमावले होते. SensonTower कडून हे डिटेल्स शेअर करण्यात आले आहेत. अशा एकूण सात अ‍ॅप्सची माहिती समोर आली आहे. जे अ‍ॅडवेयर स्कॅम्सच्या मदतीने युजर्संना नुकसान पोहोचवून कमाई करीत होते. हे अ‍ॅप्स इंटरनेटमेंट, वॉलपेपर आणि म्यूझिक अ‍ॅप्सच्या रुपात युजर्संना जाहिराती दाखवत होते. खासकरून ते लहान मुलांना टार्गेट करत होते.

चिमुकलीने केली Google ची मदत

चेक रिपब्लिक अवास्टकडून 'Be Safe Online Project' चालवण्यात आले. ज्यामध्ये मुलांना ऑनलाईन सुरक्षित कसे राहावे हे सांगितले जात होते. अशात एका मुलीने या स्कॅम अ‍ॅप्सपैकी एकाला TikTok प्रोफाईल वर प्रमोट केले जात असल्याचे रिपोर्ट केले. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले आणि धोकादायक अ‍ॅप्सना हटवण्यात आले आहे. या अ‍ॅप्सला इन्स्टाग्राम आणि टिकटॉक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रमोट केले जात होते. युजर्सच्या डिव्हाईसमध्ये जाऊन ते त्यांचं नुकसान करत होते. 

कोट्यवधींची कमाई करणारे स्कॅम अ‍ॅप्स हटवले

अ‍ॅप्सबाबत माहिती मिळताच गुगल आणि अ‍ॅपल दोघांनाही अलर्ट करण्यात आले. तसेच या अ‍ॅप्सना प्ले स्टोरवरून हटवलं आहे. अवास्टने दिलेल्या माहितीनुसार, हे अ‍ॅप्स खूप साऱ्या जाहिराती दाखवून किंवा युजर्सला 2 डॉलर ते 10 डॉलर या दरम्यान पैसे चार्ज करत होते. यात काही अ‍ॅप्स सिंपल गेम आहे. तर काहींचा वापर हा वॉलपेपर बदलण्यासाठी केला जात होता. लाखो फॉलोअर्स असलेल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर हे अ‍ॅप्स प्रमोट केले जात होते. एक हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

टॅप टू पे! Google Pay मध्ये आलं भन्नाट फीचर, जाणून घ्या कसा करायचा नेमका वापर? 

काय सांगता? WhatsApp वर पाठलेले फोटो-व्हिडीओ होणार गायब 

"मोदींनी काँग्रेसने निर्माण केलेले संबंध संपुष्टात आणले, आजूबाजूला एकही मित्र नसणे धोकादायक"

Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईची झाली तुंबई, तुफान पावसाने सर्वसामान्यांचे हाल; वाहतुकीचे तीनतेरा

माता न तू वैरिणी! 5 लाखांसाठी अल्पवयीन मुलीला विकलं, दुप्पट वयाच्या व्यक्तीसोबत लग्न लावलं अन्...

Web Title: little girl helped google in removing scam apps whic were targeting kids and making money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.