वॉटरप्रूफ स्मार्टफोनची लिस्ट! यापैकी कोणता फोन तुम्हाला स्वतःसाठी आवडेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 05:53 PM2022-08-05T17:53:06+5:302022-08-05T17:53:43+5:30

WATERPROOF SMARTPHONE : आजकाल भारतात वॉटरप्रूफ स्मार्टफोनची खूप मागणी आहे.

LOOKING FOR A LATEST MOST POPULAR WATERPROOF SMARTPHONE HERE IS THE LIST | वॉटरप्रूफ स्मार्टफोनची लिस्ट! यापैकी कोणता फोन तुम्हाला स्वतःसाठी आवडेल?

वॉटरप्रूफ स्मार्टफोनची लिस्ट! यापैकी कोणता फोन तुम्हाला स्वतःसाठी आवडेल?

Next

नवी दिल्ली : यूजर्सच्या गरजा लक्षात घेऊन स्मार्टफोनमध्ये रोज नवनवीन फीचर्स अपडेट केले जात आहेत. प्रत्येक युजर्स गरज वेगळी असू शकते. कोणाला चांगला सेल्फी घेण्यासाठी स्मार्टफोन हवा असेल तर कोणाला चांगली रॅम असलेला स्मार्टफोन पाहिजे असतो. त्याचप्रमाणे, काही लोक असे आहेत, त्यांना स्वतःसाठी असा फोन हवा आहे की, ज्यावर पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. म्हणजे वॉटरप्रूफ स्मार्टफोन.

वॉटरप्रूफ स्मार्टफोनची खासियत म्हणजे हे फोन कोणत्याही द्रवात पडून खराब होत नाहीत. पण, ते त्यात जास्त वेळ बुडून राहू नयेत. काही लोकांचे काम पाण्याशी संबंधित असते, त्यामुळे त्यांनाही असा स्मार्टफोन हवा असतो, ज्यावर पाण्याचा परिणाम होत नाही. सामान्य लोक पूलमध्ये पार्टी करताना किंवा पोहताना स्मार्टफोन वापरतात, तेव्हा त्यांना  फोनचे टेन्शन कायम असते. घरात लहान मुले असली तरी फोन पाण्यात पडण्यास वेळ लागत नाही. या काही कारणांमुळे, आजकाल भारतात वॉटरप्रूफ स्मार्टफोनची खूप मागणी आहे.

येथे आम्ही तुम्हाला काही निवडक वॉटरप्रूफ स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यापैकी कोणतेही तुम्ही खरेदी करू शकता. येथे IP67, IP68 वॉटरप्रूफ रेटिंग असलेल्या नवीन आणि सोयीस्कर स्मार्टफोनची लिस्ट आहे, जी तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडू शकता. Apple, Samsung, Oppo, Vivo, OnePlus सारख्या टॉप-रेट केलेल्या ब्रँडचे वॉटरप्रूफ स्मार्टफोन देखील आहेत.

1. शाओमी रेडमी K50i 5G ची खासियत...
- ड्युअल सिम, 3G, 4G, 5G, VoLTE, Wi-Fi, IR ब्लास्टर
- डायमेंशन 8100, ऑक्टा कोर, 2.85 GHz प्रोसेसर
- 6 GB रॅम, 128 GB इनबिल्ट
- जलद चार्जिंगसह 5080 mAh बॅटरी
- 6.6 इंच, 1080 x 2460 px, 144Hz डिस्प्ले पंच होलसह
- 64MP + 8MP + 2MP ट्रिपल रिअर आणि 16MP फ्रंट कॅमेरा
- Android v12
- ब्लूटूथ देखील आहे. 

2. सॅमसंग गॅलक्सी S20 FE 5G
- ड्युअल सिम, 3G, 4G, 5G, VoLTE, Wi-Fi, NFC
- स्नॅपड्रॅगन 865, ऑक्टा कोर, 2.84 GHz प्रोसेसर
-8 GB रॅम, 128 GB इनबिल्ट
- जलद चार्जिंगसह 4500mAh बॅटरी
- 6.5-इंच, 1080 x 2400 px, पंच होलसह 120Hz डिस्प्ले
-12 MP + 12MP + 8 MP ट्रिपल रिअर आणि 32 MP फ्रंट कॅमेरा
- मेमरी कार्ड (हायब्रिड)
-Android v10

3. अॅपल आयफोन 14 प्रो मॅक्स
- ड्युअल सिम, 3G, 4G, 5G, VoLTE, Wi-Fi, NFC
- बायोनिक A16
- 8 GB रॅम, 256 GB इनबिल्ट
- फास्ट चार्जिंगसह 4323 mAh बॅटरी
-  6.69 इंच, 1294 x 2802 px, पंच होलसह 120Hz डिस्प्ले
– 50 MP + 12MP + 12 MP ट्रिपल रिअर आणि 12 MP फ्रंट कॅमेरे
- मेमरी कार्ड सपोर्ट नाही
- iOS v15

4. ओपो रेनो 8z ची खासियत
- ड्युअल सिम, 3G, 4G, 5G, VoLTE, Wi-Fi, NFC
- स्नॅपड्रॅगन 695, ऑक्टा कोर, 2.2GHz प्रोसेसर
-8 GB रॅम, 128 GB इनबिल्ट
- जलद चार्जिंगसह 4500mAh बॅटरी
-6.43 इंच, 1080 x 2400 px, पंच होलसह 90Hz डिस्प्ले
-64 MP + 2 MP + 2 MP ट्रिपल रिअर आणि 16 MP फ्रंट कॅमेरे
- मेमरी कार्डची सुविधा.
-Android v12

Web Title: LOOKING FOR A LATEST MOST POPULAR WATERPROOF SMARTPHONE HERE IS THE LIST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.