Google देखील Apple सारखं आणणार फीचर; घरबसल्या शोधू शकणार चोरी झालेला मोबाईल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 05:52 PM2021-06-20T17:52:57+5:302021-06-20T17:55:42+5:30

Google New Feature : गुगलदेखील अॅपलप्रमाणे नवं फीचर आणण्याच्या तयारीत आहे. घरबसल्या शोधता येणार हरवलेला मोबाईल.

Lost your smartphone Use Googles Spot feature to locate device looks like apples find my phone | Google देखील Apple सारखं आणणार फीचर; घरबसल्या शोधू शकणार चोरी झालेला मोबाईल

Google देखील Apple सारखं आणणार फीचर; घरबसल्या शोधू शकणार चोरी झालेला मोबाईल

Next
ठळक मुद्देगुगलदेखील अॅपलप्रमाणे नवं फीचर आणण्याच्या तयारीत आहे.घरबसल्या शोधता येणार हरवलेला मोबाईल.

Apple या कंपनीप्रमाणेच आता Google देखील Find My Device हे नेटवर्क फीचर आणण्याच्या तयारीत आहे. जर एखाद्या व्यक्तीचा अँड्रॉईड फोन हरवला तर त्या व्यक्तीला आपला फोन या फीचरद्वारे शोधणं सोपं होणार आहे. सध्या गुगल या फीचरवर काम करत आहे. 9to5 Google च्या रिपोर्टनुसार कंपनी एक Spot नावाचं फीचर तयार करत असून गुगल प्ले सर्व्हिसेसमधील बिटा व्हर्जनमध्ये हे फीचर दिसलं आहे. 

Google च्या सपोर्ट पेजनुसार  'Find My Device' सिस्टम केवळ असे स्मार्टफोन शोधू शकतो ज्यात हा ऑप्शन ऑन आहे. यामध्ये डेटा किंवा वाय-फाय सिग्नल असेल किंवा लोकेशन सर्व्हिसेसही सुरू असेल. परंतु Spot हे फीचर अँड्रॉईड युझर्सना नेटवर्क नसल्यानंतरही फोन शोधण्यास मदत करणार आहे. 

आयफोन, आयपॅड, आयपॉड आणि मॅक डिव्हाईसेसमध्ये मिळणारं Find My App हरवलेल्या डिव्हाईची माहिती घेण्यास उपयोगी पडचं. जर एखाद्या व्यक्तीचं अॅपल डिव्हाईस हरवलं तर फाईंड माय अॅप त्यांना मॅपवर त्याचं लोकेशन दाखवतं. अशा परिस्थितीत एक साऊंड प्ले करून त्यानंतर ते अॅप फोन लॉक करून टाकतं. तसंच अॅपल डिव्हाईसच्या स्क्रिनवर एक मेसेजही दिसतो, ज्यामध्ये काही कॉन्टॅक्ट नंबर दिसतात आणि त्याद्वारे युझर्सला संपर्क केला जाऊ शकतो. 
 

Web Title: Lost your smartphone Use Googles Spot feature to locate device looks like apples find my phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.