Low Budget Phone: 10 हजारांच्या आत आला Lenovo चा दमदार Smartphone; फोनमध्ये 48MP कॅमेरा आणि 5,000mAh ची बॅटरी
By सिद्धेश जाधव | Published: February 15, 2022 12:03 PM2022-02-15T12:03:31+5:302022-02-15T12:03:48+5:30
Low Budget Mobile Phone: कंपनीनं Lenovo K14 Plus स्मार्टफोन 4GB RAM, 48MP Rear Camera, 90Hz display आणि 5,000mAh Battery सह सादर केला आहे.
Lenovo नं एक नवीन स्मार्टफोन लो बजेट स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीनं Lenovo K14 Plus स्मार्टफोन 4GB RAM, 48MP Rear Camera, 90Hz display आणि 5,000mAh Battery सह सादर केला आहे. सध्या हा फोन रशियन बाजारात आला आहे. रशियात हा फोन 9,990 RUB (सुमारे 9,800 रुपये) मध्ये लाँच झाला आहे. लवकरच अन्य देशांमध्ये देखील याची विक्री सुरु होऊ शकते.
Lenovo K14 Plus चे स्पेसिफिकेशन्स
Lenovo K14 Plus फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह यात बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. यातील 5000एमएएचची मोठी बॅटरी 10वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
लेनोवो के14 प्लस मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा अँड्रॉइड 11 ओएस चालतो. कंपनीनं यात ऑक्टाकोर प्रोसेसरसह UNISOC T700 चिपसेट दिला आहे. सोबत 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येईल.
हे देखील वाचा:
- जुन्या मोबाईल्सना आता मिळणार तगडी किंमत; Flipkart नं लाँच केला Sell Back प्रोग्राम
- TV फक्त रिमोटवरून करता बंद? विजेचं बिल वाढवते ‘ही’ छोटीशी चूक; या टिप्स करा फॉलो