स्वस्त 5G Phone च्या यादीत Moto G51 देखील होणार समावेश; शाओमी-रियलमीला Motorola कडून मिळणार टक्कर
By सिद्धेश जाधव | Published: November 3, 2021 11:56 AM2021-11-03T11:56:57+5:302021-11-03T11:57:12+5:30
Upcoming Budget 5G Phone Moto G51 Details: Motorola चा आगामी Moto G51 5G Phone सर्टिफिकेशन्स साईट एनबीटीसीवर लिस्ट करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन लवकरच ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो.
मोटोरोलाच्या आगामी ‘जी’ सीरीजच्या नवीन मोबाईल फोनवर काम करत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी आली होती. हा फोन Moto G51 नावाने स्वस्त Budget 5G Phone कॅटेगरीमध्ये सादर केला जाईल. हा फोन याच महिन्यात ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. आता हा फोन सर्टिफिकेशन्स साईट NBTC वर लिस्ट करण्यात आला आहे.
टिपस्टर अभिषेक शर्माने दिलेल्या माहितीनुसार, Moto G51 5G Phone सर्टिफिकेशन्स साईट एनबीटीसीवर लिस्ट करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी हा फोन 3सी या सर्टिफिकेशन साईटवर देखील दिसला होता. दोन्हीकडे या फोनचा मॉडेल नंबर XT2171-2 हाच होता. या लिस्टिंग्समधून लवकरच Moto G51 5G बाजारात येईल हे स्पष्ट झाले आहे.
Motorola Moto G51 चे लीक स्पेक्स
Motorola Moto G51 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. त्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर मिळेल. तसेच 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर असेल. हा फोन 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेऱ्यासह बाजारात येईल.
गीकबेंचच्या लिस्टिंगनुसार Motorola Moto G51 4 जीबी रॅमसह सादर केला जाईल. तसेच यात अँड्रॉइड 11 ओएस मिळेल. प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 750जी चिपसेट असल्याचे कोडनेम मधून समजले आहे. ज्याला एड्रेनो 619 जीपीयूची मदत मिळेल. या स्पेक्सवरून हा एक मिडरेंज 5G फोन असेल असे वाटत आहे. मोटो जी51 5जी फोनमध्ये फुलएचडी+ रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले मिळेल.