Realme चे दोन स्वस्त स्मार्टफोन लवकरच होऊ शकतात लाँच; जाणून घ्या Realme 8i आणि Realme 8s ची माहिती
By सिद्धेश जाधव | Published: July 28, 2021 11:43 AM2021-07-28T11:43:39+5:302021-07-28T11:45:21+5:30
Realme 8i and Realme 8s India Launch: Realme 8i आणि Realme 8s स्मार्टफोन लवकरच भारतात लवकरच दाखल होऊ शकतात अशी माहिती टिप्सटरने दिली आहे.
Realme आपल्या Realme 8 सीरिज अंतर्गत दोन नवीन मोबाईल फोन Realme 8i आणि Realme 8s भारतात लाँच करू शकते. या सीरिजमध्ये कंपनीने Realme 8 4G, Realme 8 5G आणि Realme 8 Pro असे तीन स्मार्टफोन याआधी लाँच केले आहेत. आता आगामी काही आठवड्यात या सीरिजमध्ये अजून दोन स्मार्टफोन्स सादर केले जाऊ शकतात अशी माहिती टिपस्टर मुकुल शर्माने ट्विटरवरून दिली आहे.
Realme 8i चे स्पेसिफिकेशन्स
काही दिवसांपूर्वी Realme 8i स्मार्टफोन चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेनावर दिसला होता. तिथे हा फोन RMX2205 मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला होता. या लिस्टिंगमधून या फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि फोटोचा देखील खुलासा झाला आहे. लिस्टिंगनुसार, Realme 8i पंच-होल डिस्प्लेसह लाँच केला जाईल, हा होल वरच्या बाजूला डावीकडे असेल. हा फोन बेजल लेस डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो, या डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस असू शकतात आणि तळाला बारीक चिन पार्ट असेल. फोनच्या मागे आयताकृती रियर कॅमेरा सेटअप तीन कॅमेरा सेन्सरसह देण्यात येईल. बॅक पॅनलवर डावीकडे ‘Dare to Leap’ ब्रँडिंग असेल. या रियलमीच्या साईड पॅनलवर पावर बटण आणि वाल्यूम रॉकर दिसत आहे.
Realme 8i टेना वर 6.43 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह लिस्ट करण्यात आला होता. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असल्यामुळे हा एक अॅमोलेड पॅनल असू शकतो. लिस्टिंगनुसार या फोनचा आकार 158.5 x 73.3 x 8.4एमएम असेल. हा फोन अँड्रॉइड 11 ओएस वर चालू शकतो. या ड्युअल सिम फोनमध्ये 4,400एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते. रियलमीने Realme 8i आणि Realme 8s बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.