खूपच कमी बजेटमध्ये Tecno Pop 5C लाँच; देणार का जियोफोन नेक्स्टला टक्कर?
By सिद्धेश जाधव | Published: November 12, 2021 07:23 PM2021-11-12T19:23:49+5:302021-11-12T19:24:44+5:30
Low Budget Phone Tecno Pop 5C Price: Tecno Pop 5C स्मार्टफोन अँड्रॉइड 10 ‘गो’ एडिशनवर चालतो. त्यामुळे फोनला जास्त रॅमची गरज पडत नाही.
TECNO ने आपल्या बजेट स्मार्टफोनसाठी प्रसिद्ध आहे. ऑगस्टमध्ये कंपनीने आपल्या पॉप सीरिज अंतर्गत Tecno POP 5P स्मार्टफोन जागतिक बाजारात आणला होता. या फोनची किंमत 8,000 रुपयांच्या आसपास ठेवण्यात आली होती. आता कंपनीने जागतिक बाजारात Tecno Pop 5C नावाने लाँच केला आहे. या फोनची किंमत मात्र समोर आलेली नाही.
Tecno Pop 5C चे स्पेसिफिकेशन्स
Tecno Pop 5C मध्ये 5-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, हा एक एलसीडी पॅनल आहे. जो 854 x 480 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा फोन जुन्या डिजाईनवर सादर करण्यात आला आहे. ज्यात रुंद बेजल आणि टच नेव्हिगेशनसाठी बटन देण्यात आले आहेत. स्क्रीनच्या वरच्या बाजूला फ्रंट फ्लॅश असलेला सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
Tecno Pop 5C स्मार्टफोन अँड्रॉइड 10 ‘गो’ एडिशनवर चालतो. त्यामुळे फोनला जास्त रॅमची गरज पडत नाही. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये Unisoc SC7731E चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 1जीबी रॅम आणि 16जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी Tecno Pop 5C मध्ये सिंगल रियर कॅमेरा मिळतो. हा 5 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. कंपनीने फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅश दिला आहे. हा फोन 2 मेगापिक्सलच्या सेल्फी सेन्सरला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह पॉवर बॅकअपसाठी टेक्नो पॉप 5सी मध्ये 2,400एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. Tecno Pop 5C ने Lake Blue आणि Dark Blue कलरमध्ये विकत घेता येईल.