रियलमी-शाओमीला लो बजेटमध्ये सॅमसंग देणार टक्कर; आगामी Samsung Galaxy A03 चे स्पेसीफिकेशन्स आले समोर
By सिद्धेश जाधव | Published: October 1, 2021 12:32 PM2021-10-01T12:32:46+5:302021-10-01T12:33:45+5:30
Cheap Phone Samsung Galaxy A03 launch: Samsung Galaxy A03 स्मार्टफोन अमेरिकन सर्टिफिकेशन्स साईट FCC वर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमधून या फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे.
सॅमसंगने गेल्याच महिन्यात भारतात Samsung Galaxy A03s लाँच केला होता. या बजेट स्मार्टफोनचा अजून एक व्हर्जनवर कंपनी काम करत आहे. लवकरच बाजारात लो बजेटमध्ये Samsung Galaxy A03 नावाचा स्मार्टफोन कंपनी सादर करू शकते. या फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती अमेरिकन सर्टिफिकेशन साईट FCC वरून समोर आली आहे.
Samsung Galaxy A03 स्मार्टफोन अमेरिकन सर्टिफिकेशन्स साईट एफसीसीवर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमधून या फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. एफसीसीवर हा SMA032M मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. तसेच Samsung Galaxy A03 स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरीसह सादर केला जाईल, असे सांगण्यात आले आहे. लिक्स आणि रिपोर्ट्सनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए03 मध्ये 3 जीबी पर्यंत रॅम मिळू शकतो. हा फोन अँड्रॉइड 11 सह सॅमसंग वनयुआय 3.1 वर चालेल. या फोनमध्ये Unisoc SC9836A चिपसेट मिळू शकतो.
भारतात सादर झालेल्या Samsung Galaxy A03s चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A03s मध्ये कंपनीने 6.5-इंचाचा एचडी+ टीएफटी एलसीडी डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 720x1600 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या लो बजेट सॅमसंग फोनमध्ये 2.3गीगाहर्ट्ज ऑक्टकोर प्रोसेसरसह मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. या प्रोसेसरला 4GB पर्यंतच्या रॅम आणि 64GB स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. ही स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित वनयुआय 3.1 वर चालतो.
Samsung Galaxy A03s मध्ये कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. ज्यात एलईडी फ्लॅश, 13 मेगपिक्सलचा मुख्य सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटीसह Samsung Galaxy A03s स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.