शानदार लूकसह Tecno Spark 8 लाँच; देणार का रेडमी-रियलमीला आव्हान?

By सिद्धेश जाधव | Published: August 31, 2021 02:51 PM2021-08-31T14:51:02+5:302021-08-31T14:53:50+5:30

Tecno Spark 8 price: Tecno Spark 8 नायजेरियात सादर केला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर, 13MP कॅमेरा आणि 5,000mAh Battery असे फीचर्स देण्यात आले आहेत.  

Low budget smartphone Tecno Spark 8 officially launched price specs sale offer  | शानदार लूकसह Tecno Spark 8 लाँच; देणार का रेडमी-रियलमीला आव्हान?

शानदार लूकसह Tecno Spark 8 लाँच; देणार का रेडमी-रियलमीला आव्हान?

Next
ठळक मुद्देTecno Spark 8 नायजेरियात सादर केला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर, 13MP कॅमेरा आणि 5,000mAh Battery असे फीचर्स देण्यात आले आहेत.  

या महिन्याच्या सुरुवातीला स्मार्टफोन निर्माता कंपनी टेक्नोने भारतात Tecno Pova 2 स्मार्टफोन सादर केला होता. या स्मार्टफोनमध्ये 7,000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली होती. भन्नाट फीचर्स असूनही कंपनीने हा फोन फक्त 10,999 रुपयांमध्ये लाँच केला होता. आता कंपनीने अजून एका स्वस्त स्मार्टफोन जागतिक बाजारात सादर केला आहे. कंपनीने नवीन स्मार्टफोन Tecno Spark 8 नायजेरियात सादर केला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर, 13MP कॅमेरा आणि 5,000mAh Battery असे फीचर्स देण्यात आले आहेत.  

Tecno Spark 8 ची किंमत 

नायजेरियात Tecno Spark 8 स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट आला आहे. 2GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेज असलेला हा फोन 55,000 Nigerian Naira मध्ये विकत घेता येईल. ही किंमत 9,500 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. आतापर्यंतचा कंपनीचा इतिहास पाहता स्वस्त फोन लवकरच भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो.  

Tecno Spark 8 चे स्पेसिफिकेशन्स 

Tecno Spark 8 एक अँड्रॉइड गो स्मार्टफोन आहे, जो अँड्रॉइड 11 गो व्हर्जनवर चालतो. ही गुगलची एक हलकी ऑपरेटिंग सिस्टम आहे, त्यामुळे या फोनमध्ये कमी रॅम देण्यात आला आहे. या फोनमध्ये कंपनीने 2GB RAM आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच हा टेक्नो स्मार्टफोन मीडियाटेकच्या हीलियो पी22 चिपसेट वर चालतो.

टेक्नो स्पार्क 8 मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन, 480nits ब्राईटनेस आणि 269ppi पिक्सल डेन्सिटीला सपोर्ट करतो. या फोनमधील ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 16MP चा मुख्य सेन्सर आणि एक क्यूवीजीए लेन्स देण्यात आली आहे. हा फोन 8 MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी टेक्नो स्पार्क 8 स्मार्टफोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 

Web Title: Low budget smartphone Tecno Spark 8 officially launched price specs sale offer 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.