WhatsApp मध्ये मिळणार दोन नवीन फीचर, बॅटरीची होणार बचत!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 08:40 PM2019-12-23T20:40:57+5:302019-12-23T20:47:34+5:30
व्हॉट्सअॅप डार्क मोडची टेस्टिंग सुरु आहे.
व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक खूशखबर आहे. इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने दोन नवीन फीचर आणले आहेत. व्हॉट्सअॅपसंबंधी माहिती देणाऱ्या WABetainfo या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपमध्ये Haptic Touch चा सपोर्ट देण्यात येत आहे. याशिवाय, डार्क थीममध्ये तीन ऑप्शन सुद्धा दिले जाणार आहेत.
व्हॉट्सअॅप डार्क मोडची टेस्टिंग सुरु आहे आणि यात तीन ऑप्शन देण्यात आले आहेत. यामध्ये एक ऑटो डार्क मोडचा ऑप्शन असणार आहे. याद्वारे जर तुम्ही अँड्राईड स्मार्टफोनमध्ये डार्क मोड यूज करणार असाल, तर व्हॉट्सअॅप सुद्धा डार्क मोडमध्ये जाईल. Haptic Touch फीचरबाबत सांगायचे झाल्यास व्हॉट्सअॅप चॅट आणि मीडियामध्ये याचा सपोर्ट मिळणार आहे. हे फिचर व्हॉट्सअॅपच्या पुढील ऑफिशियल व्हर्जनमध्ये दिले जाणार आहे. हे व्हॉट्सअॅपचे 2.20.10 व्हर्जन असणार आहे.
डार्क मोडच्या माध्यमातून युजर्संना एक ऑप्शन लो डेटा मोड सुद्धा दिले जाणार आहे. म्हणजेच, जर तुमचा स्मार्टफोन बॅटरी सेव्हर मोडवर आहे, तर व्हॉट्सअॅप स्वत: डार्क मोडवर जाईल. दरम्यान, डार्क मोडला बॅटरी सेव्हर म्हणून सुद्धा यूज केले जाते. बऱ्याच दिवसानंतर व्हॉट्सअॅपवर डार्क मोड येत असल्याची माहिती आहे. मात्र, आतापर्यंत हे फीचर फायनल व्हर्जनमध्ये देण्यात आले आहे.
दरम्यान, याआधी व्हॉट्सअॅपने कॉल वेटिंग हे नवे फीचर देण्यात आले आहे. यामध्ये कॉलच्या दरम्यान व्हॉट्सअॅपवर चॅट करता येणार आहे. कंपनीने आयओएस व्हर्जनसाठी हे खास फीचर रोलआऊट केले आहे. तसेच अपडेटमध्ये चॅट स्क्रीनही अधिक चांगली देण्यात आली आहे.