एम-टेक इरॉस प्लस : किफायतशीर स्मार्टफोन
By शेखर पाटील | Published: November 28, 2017 12:46 PM2017-11-28T12:46:21+5:302017-11-28T12:48:26+5:30
एम-टेक या कंपनीने अवघ्या ४,२९९ रूपयात फोर-जी नेटवर्क सपोर्ट असणारा इरॉस प्लस हा स्मार्टफोन ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे.
एम-टेक कंपनीचा इरॉस प्लस हा स्मार्टफोन ग्राहकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. अर्थात गोल्ड, रोझ गोल्ड आणि ग्रे या तीन रंगांमध्ये सादर करण्यात आलेल्या या स्मार्टफोनला देशभरातील शॉपिजसह सर्व ऑनलाइन ई-पोर्टलवरून ग्राहक खरेदी करू शकतात. वर नमूद केल्यानुसार यात फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असल्यामुळे हे मॉडेल जिओसह अन्य सेवांसाठी चालू शकते. याशिवाय, यामध्ये ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फीचर्स असतील. तसेच हे मॉडेल ड्युअल सीमकार्डला सपोर्ट करणारे आहे.
इरॉस प्लस हा स्मार्टफोन ५ इंच आकारमानाच्या आणि ४८० बाय ८५४ पिक्सल्स म्हणजेच एफडब्ल्यूव्हिजीए क्षमतेचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याची रॅम एक जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ६४ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. यातील मुख्य कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात व्हिजीए क्षमतेचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे. यात २,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यावर ७.५ तासांच्या टॉकटाईम इतका बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे.