भारतीयांसाठी गुड न्यूज! ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोनची विक्री वाढली; ‘ही’ कंपनी अग्रस्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 08:07 PM2022-06-17T20:07:09+5:302022-06-17T20:07:56+5:30
2022 च्या पहिल्या तिमाहीत विकल्या गेलेल्या स्मार्टफोन्सबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे.
2022 च्या पहिल्या तिमाहीत विकल्या गेलेल्या स्मार्टफोन्सबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमधून भारतीयांना खुश करणारी बातमी समोर आली आहे. या कालावधीत 'मेड इन इंडिया' स्मार्टफोनच्या शिपमेंटमध्ये 7 टक्क्यांची वाढ झाली आहे. मेड इन इंडिया स्मार्टफोनची शिपमेंट Q1 2022 मध्ये 4.8 कोटी युनिट्सपर्यंत पोहोचली आहे. काउंटरपॉइंटच्या टेक्नॉलॉजी मार्केट रिसर्चच्या मेक इन इंडिया सर्विसमधून या लेटेस्ट रिसर्चमधील डेटाचा खुलासा झाला आहे. रिपोर्टनुसार, या तीन महिन्यात सर्वाधिक 'मेड इन इंडिया' स्मार्टफोनची शिपमेंट ओप्पोनं केली आहे.
मेड इन इंडिया स्मार्टफोनची विक्री वाढली
लोकल मॅन्युफॅक्चरिंग सिस्टमबाबत बोलताना, सीनियर रिसर्च अनॅलिस्ट प्रचिर सिंह यांनी म्हटलं आहे की, "भारतात स्मार्टफोन निर्मिती वाढली आहे. 2021 मध्ये 'मेड इन इंडिया' स्मार्टफोनची शिपमेंट 19 कोटी युनिट्स पेक्षा जास्त होती. भारतातील वाढती मागणी तसेच निर्यात यामुळे यात वाढ झाली आहे. तसेच स्थानिक निर्मिती वाढवण्याची सरकारकडून देखील प्रोत्साहन मिळालं आहे."
वर सांगितल्याप्रमाणे ओप्पो 2022 च्या पहिल्या तिमाहीत 22 टक्के वाढीसह मेड इन इंडिया स्मार्टफोन शिपमेंटमध्ये सर्वात पुढे आहे. तर दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगनं या कालावधीत 21 टक्के वार्षिक वाढ पहिली आहे. सॅमसंग दुसऱ्या स्थानी आहे.
फीचर फोन्सची मागणी घटली
रिपोर्टमधून फिचर फोन्सच्या बाजाराची देखील माहिती मिळाली आहे. त्यानुसार 2022 च्या पाहिल्यात तिमाहीत फीचर फोनची निर्मिती गेल्या वर्षीच्या तुलनेत 41 टक्क्यांनी कमी झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून फीचर फोनची मागणी कमी होत आहे. रिपोर्टनुसार, या सेगमेंटमध्ये स्वदेशी कंपनी लावानं 2022 च्या पहिल्या तिमाहीत 21 टक्के बाजारावर कब्जा करत 'मेड इन इंडिया' फीचर फोन शिपमेंटमध्ये पाहिलं स्थान मिळवलं आहे.