जादुई चष्मा : मॅसेज वाचणारा, आवाजाने नियंत्रित होणारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 11:18 AM2018-10-28T11:18:00+5:302018-10-28T11:19:08+5:30

घरातून घाईघाईत बाहेर पडला असाल आणि टीव्ही किंवा कोणतेही अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू चालू राहिली असेल तर चिंता करण्याचे कारण ...

Magical specs: Message reader, controlled by voice | जादुई चष्मा : मॅसेज वाचणारा, आवाजाने नियंत्रित होणारा

जादुई चष्मा : मॅसेज वाचणारा, आवाजाने नियंत्रित होणारा

googlenewsNext

घरातून घाईघाईत बाहेर पडला असाल आणि टीव्ही किंवा कोणतेही अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू चालू राहिली असेल तर चिंता करण्याचे कारण नाही. केवळ एका चष्म्याच्या आधारे सूचना देऊन ते बंद करता येणार आहे. कॅनडाच्या स्टार्ट अप कंपनीने असा जादुई चष्मा बनविला आहे, जो रोजचे जगणे सोपे करणार आहे. 


या स्मार्ट चष्म्यावर एक छोटा प्रोजेक्टरही लावण्यात आला आहे. चष्मा घालणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यानुसार याला कमी जास्त करता येते. या चष्म्याचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे हा चष्मा वापरणाऱ्याच्या घरातील स्पीकरशी जोडला जातो.

 
या चष्म्याद्वारे आवाजी सुचनेवरून घारातील स्मार्ट उपकरणे चालू-बंद केली जाऊ शकतात. तसेच हा चष्मा तुमच्या फोनवर आलेले मॅसेज वाचून दाखवतो. हवामानाची माहितीही देतो. हे सर्व अलर्ट चष्म्याच्या स्मार्ट ग्लासवर मिळतात. 


 या चष्म्यासोबत हाताच्या बोटात घालण्यासाठी अंगठीही येते. तीला सुरु केल्यानंतर नोटिफिकेशन मिळण्यास सुरुवात होते. या अंगठीला लूप असे नाव आहे. तिच्या वापराने स्मार्ट स्क्रीनवर नोटिफिकेशन उजव्या किंवा डाव्या बाजुला घेता येते. 


अॅमेझॉनच्या अॅलेक्सासोबत हा चष्मा जोडला जातो. यानंतर अनेक सूचना करता येतात. यामध्ये गाणे सुरु करणे, बातम्या ऎकवणे अशी कामेही करता येतात. 


एका चार्जिंगमध्ये हा चष्मा 18 तास काम करतो. तसेच या चष्म्याला सामान्य कामांवेळीही वापरता येते. या चष्म्याची आगाऊ बुकिंग सुरु झाली असून 75 हजार रुपये किंमत ठेवण्यात आली आहे.
 

Web Title: Magical specs: Message reader, controlled by voice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.