WhatsApp मध्ये झाले मोठे बदल, आता फक्त चॅटमध्ये प्रोफाइलची माहिती दिसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 06:00 PM2023-11-25T18:00:49+5:302023-11-25T18:01:15+5:30
व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना लवकरच चॅट विंडोमध्येच कॉन्टॅक्टच्या प्रोफाइलशी संबंधित माहिती दाखवली जाईल.
WhatsApp हे सर्वात प्रसिद्ध मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्स अॅप आपल्या वापरकर्त्यांना नेहमी नवीन फिचर देत असते. आता व्हॉट्सअॅप एका फीचरवर काम करत आहे, याच्या मदतीने यूजरच्या प्रोफाईलशी संबंधित माहिती चॅट विंडोमध्येच दिसेल. जेव्हा कोणत्याही नंबरवरून आपल्याला मेसेज मिळतो, तेव्हा त्याची प्रोफाइल माहिती चॅट माहितीमध्ये न जाता पाहिली जाऊ शकते.
चायनीज लोकांची iPhoneकडे पाठ; 'या' दोन मोबाईल्सना पसंती! चीनची नवी खेळी की...?
अनोळखी संपर्कातून मेसेज आल्यावर व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी हे नवीन फीचर फायदेशीर ठरणार आहे. यानंतर, चॅट उघडण्याव्यतिरिक्त, वापरकर्त्यांना चॅट माहिती पेजवर जावे लागेल. येथे युजरचा प्रोफाईल फोटो, नाव आणि स्टेटस यांसारखी माहिती दाखवली जाते. आता ही माहिती पाहण्यासाठी तुम्हाला चॅट इन्फो पेजवर जाण्याची गरज नाही. चॅट विंडो ओपन होताच प्रोफाइलशी संबंधित माहिती आता वरच्या बाजूला दिसेल.
हे नवीन फीचर अँड्रॉइड व्हर्जन 2.23.25.11 अपडेटसाठी व्हॉट्सअॅप बीटाचा एक भाग बनवण्यात आले आहे, जे Google Play Store वर उपलब्ध आहे. नवीन बदलासह, संभाषणाचा भाग म्हणून मेसेजिंग अॅपमधील प्रोफाइल माहिती चॅटिंग विंडोमध्ये दृश्यमान होईल. युजर्सचा फीडबॅक घेतल्यानंतर या फीचरचा अॅपमध्ये समावेश करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
एका अहवालात दिलेल्या माहितीनुसार, अनेक वापरकर्त्यांनी मागणी केली होती की वापरकर्त्याच्या प्रोफाइलशी संबंधित मूलभूत माहिती संभाषणांमध्येच दर्शविली जावी आणि मेटाच्या मालकीच्या अॅपने या आधारावर एक नवीन बदल केला आहे. प्रोफाईल माहितीच्या मदतीने एखाद्या संपर्काशी बोलायचे की नाही हे सहज ठरवता येते. आता यासाठी वेगळे स्टेप्स फॉलो करण्याची गरज नाही. लवकरच सर्व युजर्सना या बदलाचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल.
नवीन फीचरचा आणखी एक फायदा म्हणजे नाव किंवा स्टेटस यासारख्या प्रोफाईल माहितीमध्ये वापरकर्त्याने केलेले बदल लगेच दिसून येतील. सध्या, हे बदल चॅट माहिती पेजला भेट दिल्यानंतरच दिसत आहे आणि तसे न केल्यास, ते बऱ्याच काळासाठी दृश्यमान होणार नाहीत. प्लॅटफॉर्म WhatsApp चॅनेल मालकांसह नवीन फिटरची चाचणी देखील करत आहे आणि त्यांना निलंबित चॅनेलबद्दल चांगली माहिती देईल.