मोबाइलमध्ये नक्की ठेवा हे ३ ॲप्स; कामांसाठी खूपच फायदेशीर ठरतील

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 08:27 AM2023-02-19T08:27:47+5:302023-02-19T08:28:15+5:30

१२०० हून अधिक सरकारी सुविधांचा लाभ तुम्ही घेऊ शकता. हे ॲप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१७ मध्ये लॉन्च केले होते.

Make sure to keep these 3 apps in your mobile; Will be very beneficial for work | मोबाइलमध्ये नक्की ठेवा हे ३ ॲप्स; कामांसाठी खूपच फायदेशीर ठरतील

मोबाइलमध्ये नक्की ठेवा हे ३ ॲप्स; कामांसाठी खूपच फायदेशीर ठरतील

googlenewsNext

सरकारी योजनांची माहिती असो किंवा कुठे सरकारी कागदपत्रांद्वारे व्हेरिफिकेशनची आवश्यकता असो, काही मोबाइल ॲप्स अशा कामांसाठी खूपच फायदेशीर ठरतात. हे ॲप्स सरकारी सेवांबद्दलही अपडेट देतात. जाणून घेऊया अशाच ३ ॲप्सबाबत...

Digilocker डिजिलॉकर हा डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचा एक प्रमुख उपक्रम आहे. लोकांची महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी हे ॲप तयार केले आहे. येथे पॅन कार्ड, आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स सुरक्षित ठेवता येतात. या ॲपसह वापरकर्त्याला कागदपत्रांची हार्ड कॉपी बाळगण्याची गरज नाही. अशा प्रकारे हे ॲप काम सोपे करते.

M-Aadhar बँकांसह अनेक सरकारी कार्यालयांमध्ये कामासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. अनेक प्रकरणांमध्ये एम-आधारदेखील वैध आहे. या ॲपच्या मदतीने यूजर्स आधार कार्डची डिजिटल कॉपी मिळवू शकतात आणि ती सेव्ह करू शकतात. याच्या मदतीने आधार अपडेटही करता येईल. हे ॲप अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे.

Umang याच्या मदतीने, पीएफ बॅलेन्स तपासण्यापासून पॅन कार्डसाठी अर्ज करण्यापर्यंतची कामे करता येतात. याशिवाय गॅस बुकिंग, वीज आणि पाण्याची बिले जमा करणे यासह १२०० हून अधिक सरकारी सुविधांचा लाभ तुम्ही घेऊ शकता. हे ॲप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१७ मध्ये लॉन्च केले होते.

Web Title: Make sure to keep these 3 apps in your mobile; Will be very beneficial for work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल