अँड्रॉइड फोनला बनवा वॉकी-टॉकी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 11:34 AM2022-09-25T11:34:57+5:302022-09-25T11:43:05+5:30
वॉकी-टॉकीसाठी भारतात अनेकदा परवाना घ्यावा लागतो; पण....
अनेकदा इव्हेंटदरम्यान किंवा अन्य कार्यक्रमात तुम्हाला तुमच्या टीमशी कमी अंतरावर असूनही पुन्हा पुन्हा बोलावे लागते. अशावेळी प्रत्येकदा कॉल करणे त्रासदायक असते; काही ॲप्सद्वारे तुमच्या फोनलाच वॉकी-टॉकी बनवू शकता.
वॉकी-टॉकीसाठी भारतात अनेकदा परवाना घ्यावा लागतो; पण पीटीटी ॲपमध्ये कोणतीही वेगळी रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरली जात नाही, त्यामुळे परवान्याचीही गरज लागत नाही.
पीटीटी ॲप्स उपयुक्त
पीटीटी म्हणजेच पुश टू टॉक ॲप्सची मदत घ्या. गुगल प्ले स्टोअरवर झेलो (zello), टूवे (Two Way), मार्को पोलो (Marco Polo) असे काही मोफत ॲप्स आहेत. रेटिंग पाहून, वॉकी-टॉकी बनवायचे असलेल्या दोन्ही फोनमध्ये हे ॲप इन्स्टॉल करा. यानंतर, पुशसह वॉकी-टॉकीप्रमाणेच कनेक्ट केलेल्या उपकरणाशी संवाद साधता येईल.
डेटा-कॉलिंग प्लॅनची गरज नाही
हे ॲप्स मोबाइल डेटा कनेक्टिव्हिटीसह चालतात, जर तुम्हाला जुन्या फोनवर सिमशिवाय ते वापरायचे असतील तरी शक्य आहे. यासाठी, दोन्ही फोन ब्लूटूथसह कनेक्ट करा आणि ॲपमधील ब्लूटूथ सेटिंग्ज निवडा. अशा प्रकारे दोन्ही फोन ब्लूटूथला कनेक्ट केल्यानंतर इंटरनेट किंवा कॉलिंग प्लॅनशिवायही एकमेकांशी संवाद साधता येईल; परंतु लक्षात ठेवा, ब्लूटूथची कमाल श्रेणी १०० मीटर असते. ५० मीटरच्या आत स्पष्ट आवाज येईल.