Apple Watch मधून गर्लफ्रेंडवर ठेवत होता पाळत, पोलिसांनी केली अटक; नेमकं काय घडलं? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 09:17 PM2022-03-28T21:17:31+5:302022-03-28T21:18:20+5:30
तंत्रज्ञानाचा वापर करुन होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये गेल्या काही काळापासून वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे. यात गुन्हेगार Apple AirTag चा वापर करुन लक्ष्यावर पाळत ठेवत असल्याचीही प्रकरणं याआधी समोर आली आहेत.
तंत्रज्ञानाचा वापर करुन होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये गेल्या काही काळापासून वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे. यात गुन्हेगार Apple AirTag चा वापर करुन लक्ष्यावर पाळत ठेवत असल्याचीही प्रकरणं याआधी समोर आली आहेत. आता याच पाळत प्रकरणामध्ये आणखी एक नवं प्रकरण समोर आलं आहे. यात एक व्यक्ती Apple Watch च्या माध्यमातून आपल्या गर्लफ्रेंडवर पाळत ठेवत असल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणात संबंधित तरुणाला अटक देखील केली आहे.
एक अमेरिकन व्यक्ती Apple Watch च्या माध्यमातून आपल्या गर्लफ्रेंडला ट्रॅक करत होता. यासाठी त्यानं स्वत: Apple Watch गर्लफ्रेंडच्या कारमध्ये लपवलं होतं आणि ट्रॅकिंग फिचरचा वापर करुन तिच्यावर पाळत ठेवत होता.
पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार तिचा प्रियकर लॉरेन्स वेल्च यानं अनेकदा तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तिनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार लॉरेन्स तिच्यावर Life360 अॅपच्या माध्यमातून तिचं लोकेशन ट्रेस करत होता. प्रियकराकडून धमक्या येण्यास सुरुवात झाल्यानंतर तिनं Life360 अॅप डिअॅक्टीव्हेट केलं होतं. मग प्रियकरानं Apple Watch च्या माध्यमातून तिच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. यासाठी त्यानं Apple Watch तिच्या कारमध्ये ठेवलं होतं. याची माहिती तिनं पोलिसांना दिली.
Apple Watch, Airpods, iPhones सारख्या अॅपल डिव्हाइसमधून लोकेशन अगदी सहजपणे ट्रेस करता येतं. यात FindMy App सारख्या अॅपचा वापर करुन लोकेशन ट्रेस करता येतं. दरम्यान, Apple Watch च्या माध्यामातून एखाद्यावर पाळत ठेवली गेल्याचं हे पहिलं प्रकरण समोर आलं असल्याचं सांगितलं जात आहे.