वेळीच व्हा सावध! 100 रुपयांच्या लोभापोटी गमावले 12 लाख; 'ती' एक चूक पडली महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 11:45 AM2023-08-10T11:45:20+5:302023-08-10T11:52:03+5:30

एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

man loses 12 lakh in return of rs 100 online fraud | वेळीच व्हा सावध! 100 रुपयांच्या लोभापोटी गमावले 12 लाख; 'ती' एक चूक पडली महागात

वेळीच व्हा सावध! 100 रुपयांच्या लोभापोटी गमावले 12 लाख; 'ती' एक चूक पडली महागात

googlenewsNext

भारतात ऑनलाईन फसवणुकीची नवीन प्रकरणे समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. सुरुवातीला त्याला प्रति लाईक 100 रुपये देण्याचे आमिष दाखवण्यात आले.

वडोदरा येथील रहिवासी असलेल्या प्रकाश सावंत यांनी सायबर क्राईम पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आपली लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मार्च महिन्यात सावंत यांना इन्स्टंट मेसेजिंग एप WhatsApp वर एका महिलेचा मेसेज आला जिने स्वतःची ओळख दिव्या म्हणून केली होती.

दिव्याने प्रकाश यांना एका कामाची ऑफर दिली, ज्यामध्ये सोशल मीडिया इंफ्लूएन्सप म्हणून काम करावे लागेल. यामध्ये तिने सांगितलं की, तुम्ही चांगली कमाई करू शकता. व्यक्तीला सांगितलं की, इन्स्टाग्रामवरील सेलिब्रिटीच्या पोस्टला लाईक करावे लागेल आणि अकाउंट सबस्क्राईब करावे लागेल.

दिव्याने व्यक्तीला सांगितलं की, प्रत्येक टास्कमध्ये दोन लाईक्स दिले जातील आणि त्या बदल्यात 200 रुपये दिले जातील. म्हणजे एका लाईकवर 100 रुपये पेमेंट आहे. तसेच यातून रोज 1 हजार ते 15 हजार रुपये कमवू शकतो, असे आमिष दाखवलं.

दिव्याने व्य़क्तीला इन्स्टाग्राम लिंक शेअर केली आणि त्यांना तसं करण्यास सांगितलं, त्यानंतर स्क्रीनशॉट घ्या आणि कार्य पूर्ण झाल्यानंतर पाठवा. यानंतर व्यक्तीला एका ग्रुपमध्ये एड करून अनेक लिंक शेअर करण्यात आल्या.

सावंत यांचा विश्वास जिंकण्यासाठी घोटाळेबाजांनी प्रथम 200 रुपये शेअर केले. यानंतर सावंत यांना या कामाबद्दल थोडा आत्मविश्वास आला. यानंतर लकी नावाच्या दुसऱ्या महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला आणि ऑनलाइन ग्रुपमध्ये एड केलं. या ग्रुपमध्ये दररोज 25 टास्क देण्यात आले. त्यानंतर त्यांना Youtube Video लाइक करण्यास सांगण्यात आले. बँक खात्यात 500 रुपये जमा झाले.

व्यक्तीला अधिक कमाईसाठी प्रीपेड योजनेबद्दल सांगण्यात आले आहे, ज्यामध्ये त्यांना काही रुपये जमा करण्यास सांगितले. सावंत यांना आधी 1000 रुपये दिले, त्यानंतर 1300 रुपये मिळाले. यानंतर, 10,000 रुपये भरल्यानंतर त्यांना 12,350 रुपये परत मिळाले. अशा स्थितीत सावंत यांना हे काम योग्य असल्याची खात्री पटली. यानंतर त्यांनी 11.27 लाख रुपये भरले.

11.27 लाख रुपये हस्तांतरित केल्यानंतर, अतिरिक्त 11.27 लाख रुपये मागितले. 45 लाख रुपये मिळविण्यासाठी नवीन व्यवहार करावा लागेल, असं स्कॅमर्सनी सांगितलं. पण सावंत यांनी पैसे नसल्याचं सांगितलं. याच दरम्यान त्यांचे 12 लाख देखील बुडाले. त्यानंतर सावंत यांनी फसवणुकीची तक्रार नोंदवली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: man loses 12 lakh in return of rs 100 online fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.