आवाजापासून लोकेशनपर्यंत युजर्सच्या सर्व गोष्टींवर गुगलची नजर; त्वरीत बदला 'या' सेटिंग्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 17:49 IST2019-07-25T17:44:06+5:302019-07-25T17:49:52+5:30

गुगल प्रत्येक ठिकाणी युजर्सना ट्रॅक करत असतं. आवाजापासून लोकेशनपर्यंत युजर्सच्या सर्व गोष्टींवर गुगलची नजर असते.

many sites track your online activities change these google privacy settings now | आवाजापासून लोकेशनपर्यंत युजर्सच्या सर्व गोष्टींवर गुगलची नजर; त्वरीत बदला 'या' सेटिंग्स 

आवाजापासून लोकेशनपर्यंत युजर्सच्या सर्व गोष्टींवर गुगलची नजर; त्वरीत बदला 'या' सेटिंग्स 

ठळक मुद्देगुगल प्रत्येक ठिकाणी युजर्सना ट्रॅक करत असतं.आवाजापासून लोकेशनपर्यंत युजर्सच्या सर्व गोष्टींवर गुगलची नजर असते. आवाजापासून लोकेशनपर्यंत युजर्सच्या सर्व गोष्टींवर गुगलची नजर असते.

नवी दिल्ली - गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. इंटरनेट सर्च, कॅलेंडर, स्मार्ट असिस्टेंट, मॅप्स आणि लोकेशन डेटा पर्यंत युजर्सची सर्व माहिती ही गुगलकडे असते. 

गुगल प्रत्येक ठिकाणी युजर्सना ट्रॅक करत असतं. आवाजापासून लोकेशनपर्यंत युजर्सच्या सर्व गोष्टींवर गुगलची नजर असते. युजर्सचा डेटा लीक झाल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे महत्त्वाची खासगी माहिती सुरक्षित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळेच गुगल अकाऊंटच्या सेटिंग्समध्ये काही बदल करणं आवश्यक आहे.  

ई-मेल ट्रॅकिंग ब्लॉक करा

युजर्स अनेकदा एकापेक्षा अधिक ईमेल अकाऊंचा वापर करत असतात. जीमेल अकाऊंट ओपन करा. त्यामधील सेटिंगमध्ये जा. स्क्रोल केल्यावर इमेजेसचा पर्याय दिसेल. त्यामध्ये "Ask before displaying external images." हा पर्याय निवडा आणि बदल सेव्ह करा. असं केल्यास मेल ट्रॅक होणार नाही.

लोकेशन ट्रॅकिंग बंद करा

लोकेशन हिस्ट्रीमध्ये युजर्सच्या लोकेशनची माहिती असते. myaccount.google.com वर जा. त्यानंतर Google Account मध्ये डेटा आणि  personalization नंतर Location History वर जा. त्यानंतर टॉगलवर Paused पर्यायावर क्लिक करा व सेव्ह करा. म्हणजे लोकेशन ट्रॅकिंग बंद होईल. 

व्हॉईस रेकोर्डिंग हटवा

गुगल हे केवळ सर्च इंजिन नाही तर एक स्मार्ट असिस्टेंट देखील आहे. त्यामुळेच व्हॉईस कमांड देऊन गुगल सर्च करता येतं. व्हॉईस रेकोर्डिंग हटवण्यासाठी माय अकाऊंट पेजवरून Data & personalization या पर्यायावर जा. तिथे Voice & Audio Activity वर क्लिक करा आणि पुन्हा टॉगल Paused करा. 

know how to automatically delete emails from gmail inbox using email studio | Gmail इनबॉक्समधील नको असलेले ईमेल होणार ऑटोमॅटीक डिलीट, जाणून घ्या कसं

Purchase history डिलीट करा 

युजर्स जेव्हा जीमेलचा वापर करतात तेव्हा गुगल केलेली खरेदीही ट्रॅक करत असतं. Purchase history डिलीट करण्यासाठी मेल अकाऊंटमध्ये जाऊन https://myaccount.google.com/purchases मध्ये जा. तिथे रिमूव्ह परचेस >व्ह्यू ईमेल > More>Delete this message असा पर्याय निवडा. 

टू फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन करा

हॅकिंगपासून बचाव करण्यासाठी प्रामुख्याने टू फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन केलं जातं. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करण्यासाठी Security मध्ये 2-Step Verification वर जा. re-enter your password वर क्लिक करून पुढच्या स्टेप्स फॉलो करा. 

Google चे कर्मचारी ऐकतात युजर्सचं प्रायवेट व्हॉईस रेकॉर्डिंग

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. मात्र गुगलच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुगल युजर्सच्या सर्व गोष्टी ऐकतो. गुगलचे थर्ड पार्टी कर्मचारी युजर्सचे वैयक्तिक संवाद ऐकतात. तसेच ते संवाद रेकॉर्डही केले जातात अशी माहिती आता समोर आली आहे.  गुगल होम स्मार्ट स्पीकर या गुगलचे सेवेचे कर्मचारी युजर्सच्या फोनमध्ये असलेले वैयक्तिक ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकतात. गुगलनेही हे मान्य केलं आहे. मात्र गुगलने यामागेचं कारण सांगितलं आहे. स्मार्ट स्पीकर हे वेगवेगळ्या भाषांमधून ट्रान्स्क्राईब ही सेवा पुरवतं. या सेवेत विविध स्थानिक भाषांमधून बोलणं ऐकून त्यांचे अर्थ लावण्याचं काम केलं जातं आणि त्यानुसार या फीचरमध्ये सुधारणा व्हावी या हेतूने हे ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकलं जात असल्याची माहिती गुगलने दिली आहे. 

 

Web Title: many sites track your online activities change these google privacy settings now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.