Facebook, Instagram युजर्सना करता येणार छप्परफाड कमाई; मार्क झुकेरबर्गची घोषणा, जाणून घ्या कसं?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 05:02 PM2022-06-22T17:02:46+5:302022-06-22T17:11:05+5:30
Facebook, Instagram : फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मोठी कमाई करण्याची संधी मिळणार आहे. कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. यासोबतच या माध्यमातून कमाई करण्याच्या काही पद्धती देखील सांगितल्या आहेत.
नवी दिल्ली - Facebook आणि Instagram क्रिएटर्ससाठी आता एक खूशखबर आहे. युजर्सना यामार्फत आता छप्परफाड कमाई करता येणार आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मोठी कमाई करण्याची संधी मिळणार आहे. कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. यासोबतच या माध्यमातून कमाई करण्याच्या काही पद्धती देखील सांगितल्या आहेत.
मार्क झुकेरबर्ग यांनी एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, कंपनी 2024 पर्यंत फेसबुक आणि इन्स्टाग्राम क्रिएटर्सकडून कोणत्याही प्रकराचा रेवेन्यू घेणार नाही. यामध्ये पेड ऑनलाईन इवेंट, सब्सक्रिप्शन, बॅज आणि बुलेटिनचा समावेश आहे. तसेच क्रिएटर्सना या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पैसे कमवण्याच्या नव्या पद्धतीची देखील माहिती दिली आहे. कंपनीने कंटेट क्रिएटर्ससाठी पाच नवीन फीचर्स घोषणा केली आहे
Interoperable Subscriptions
Interoperable Subscriptions हे फीचर क्रिएटर्सना त्यांच्या पे करणाऱ्या सब्सक्राइबर्सना इतर प्लॅटफॉर्मवर Facebook Only ग्रुपमध्ये सहभागी करण्यास परवानगी देईल.
Facebook Stars
कंपनी स्टार्स नावाचे त्यांचे टिपिंग फीचर सर्व पात्र क्रिएटर्ससाठी उघडत आहे जेणेकरून अधिक लोक त्यांच्या रील, थेट किंवा VOD व्हिडिओमधून कमाई करण्यास सुरुवात करू शकतील.
Monetizing Reels
कंपनी Facebook वर अधिक क्रिएटरसाठी Reels Play बोनस प्रोग्राम उघडत आहे. क्रिएटर्सना Instagram रील्स Facebook वर क्रॉस-पोस्ट करून तिथे मॉनिटाइज करू शकता.
Creator Marketplace
इन्स्टाग्रामवर अशा सेट प्लेसची चाचणी सुरू आहे जिथे क्रिएटर्सना शोधले जाऊ शकते आणि पैसे दिले जाऊ शकतात. जेथे ब्रँड नवीन भागीदारीच्या संधी शेयर करू शकतात.
Digital Collectibles
Instagram वर NFT डिस्प्लेसाठी सपोर्ट विस्तारत आहे. "आम्ही हे फीचर लवकरच Facebook वर आणणार आहोत. जेणेकरून लोक इन्स्टाग्राम आणि Facebook वर क्रॉस-पोस्ट करू शकतील असं मार्क झुकेरबर्ग यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.