MediaTek चा Dimensity 9000 सुपरफास्ट 5G प्रोसेसर लाँच; N4 सेमीकंडक्टरसह येणारा जगातील पहिला चिपसेट 

By सिद्धेश जाधव | Published: November 20, 2021 12:33 PM2021-11-20T12:33:20+5:302021-11-20T12:36:38+5:30

MediaTek Dimensity 9000 5G: MediaTek ने प्रीमियम स्मार्टफोनसाठी नवीन Dimensity 9000 5G प्रोसेसर लाँच केला आहे. हा N4 सेमीकंडक्टरसह येणारा जगातील पहिला प्रोसेसर आहे. 

Mediatek dimensity 9000 soc announced for flagship devices  | MediaTek चा Dimensity 9000 सुपरफास्ट 5G प्रोसेसर लाँच; N4 सेमीकंडक्टरसह येणारा जगातील पहिला चिपसेट 

MediaTek चा Dimensity 9000 सुपरफास्ट 5G प्रोसेसर लाँच; N4 सेमीकंडक्टरसह येणारा जगातील पहिला चिपसेट 

Next

MediaTek Dimensity 9000 5G: MediaTek आणि Qualcomm या दोन कंपन्या स्मार्टफोन प्रोसेसर सेगमेंटमध्ये आघाडीवर आहेत. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांमध्ये सतत स्पर्धा सुरुच असते. किंमत कमी ठेवण्यासाठी स्मार्टफोन कंपन्या बजेट आणि मिडरेंजमध्ये मीडियाटेक प्रोसेसरचा वापर करताना दिसतात. परंतु फ्लॅगशिप आणि प्रीमियम फोन सेगमेंटमध्ये क्वॉलकॉमचा दबदबा दिसून येतो. परंतु आता हे दृश्य बदलणार असे दिसत आहे, कारण मीडियाटेकने प्रीमियम स्मार्टफोनसाठी नवीन Dimensity 9000 5G प्रोसेसर लाँच केला आहे.  

MediaTek Dimensity 9000 5G 

हा प्रोसेसर Qualcomm च्या आगामी Snapdragon 898 SoC ला थेट टक्कर देऊ शकतो. मीडियाटेकच्या हा नवीन चिपसेट N4 सेमीकंडक्टरसह येणारा जगातील पहिला प्रोसेसर आहे, हे याची खासियत म्हणता येईल. त्यामुळे या चिपचा आकार कमी आणि वेग वाढला आहे. हा प्रोसेसर नवीन कम्प्युटिंग कोर Cortex-X2 वर आधारित आहे, असे कंपनीने सांगितले आहे. मीडियाटेकने या प्रोसेसरची निर्मिती तैवानी कंपनी Hsinchu सोबत मिळून केली आहे.  

हा चिपसेट फ्लॅगशिप फोन्समध्ये वापरला जाईल, असे देखील कंपनीने सांगितले आहे. परंतु स्मार्टफोन निर्माता किंवा स्मार्टफोन मॉडेलची माहिती मात्र दिली नाही. लवकरच हा चिपसेट Xiaomi, Vivo, Oppo आणि Realme फोनमध्ये दिसू शकतो. हा चिपसेट क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 898 च्या तुलनेत किती वेगवान आहे हे मात्र दोन्ही प्रोसेसर असलेले फोन बाजारात उपलब्ध झाल्यावरच समजेल.  

Web Title: Mediatek dimensity 9000 soc announced for flagship devices 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.