बजेट आणि मिड-रेंज स्मार्टफोनचा वाढणार वेग; मीडियाटेकचे दोन नवीन प्रोसेसर सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 07:32 PM2021-07-16T19:32:52+5:302021-07-16T19:33:44+5:30
MediaTek Helio G96 and Helio G88: मीडियाटेकने MediaTek Helio G88 आणि MediaTek Helio G88 हे दोन नवीन प्रोसेसर सादर केले आहेत.
चिपसेट निर्माता कंपनी मीडियाटेक दोन नवीन चिपसेट सादर केले आहेत. हे चिपसेट MediaTek Helio G96 आणि MediaTek Helio G88 नावाने लाँच झाले आहेत. यातील मीडियाटेक हीलियो जी96 प्रोसेसर 120 हर्ट्ज फुल-एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करू शकतो, तसेच 108 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 4G LTE सह ड्युअल 4G SIM कार्डला सपोर्ट देखील मिळेल. तर मीडियाटेक हीलियो जी88 प्रोसेसरमध्ये फुल-एचडी+ डिस्प्लेसह 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट, 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि 4G VoLTE सपोर्ट देण्यात आला आहे. या दोन्ही प्रोसेसरसोबत मीडियाटेकची HyperEngine 2.0 Lite गेम टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. (MediaTek Helio G96 and Helio G88 launched)
MediaTek Helio G96 प्रोसेसर 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्लेला सपोर्ट करेल, तसेच फुल-एचडी+ रिजोल्यूशन पर्यंतचा सपोर्ट यात देण्यात आला आहे. हा सपोर्ट LCD आणि AMOLED दोन्ही डिस्प्लेसाठी असेल. हीलियो जी96 मध्ये दोन आर्म कॉर्टेक्स-ए76 सीपीयू 2.05GHz पर्यंत स्पीडसह देण्यात येतील. यात LPDDR4X मेमरी आणि UFS 2.2 स्टोरेज असेल. तसेच हा प्रोसेसर 108 मेगापिक्सल कॅमेरा, fast Cat-13 4G LTE WorldMode मॉडेम इंटीग्रेशन, ड्युअल 4जी सिम आणि VoLTE व ViLTE अश्या सर्व्हिसेसना सपोर्ट करू शकतो. सोबत कंपनीच्या इंटेलिजंट रिसोर्स मॅनेजमेंट इंजिन आणि नेटवर्किंग इंजिनचा सपोर्ट मिळेल.
मीडियाटेक हीलियो जी88 प्रोसेसरमध्ये 90 हर्ट्ज डिस्प्ले रिफ्रेश रेटची मर्यादा आहे. यातील ऑक्टा-कोर सीपीयू मध्ये दोन आर्म कॉर्टेक्स-ए75 सीपीयू 2.0GHz पर्यंतच्या स्पीडसह मिळतील. हीलियो जी88 सह येणाऱ्या फोनमध्ये 64 मेगापिक्सल पर्यंतचा मुख्य कॅमेरा, ड्युअल कॅमेरा बोकेह कॅप्चरसाठी हार्डवेयर डेप्थ इंजिन, कॅमेरा कंट्रोल यूनिट (सीपीयू), इलेक्ट्रोनिक इमेज स्टेब्लाइजेशन (ईआईएस) आणि रोलिंग शटर कम्पेशन (RSC) टेक्नॉलॉजी असे फिचर मिळतील. हीलियो जी88 मध्ये वॉयस असिस्टंट सर्विससाठी वॉयस वेकअप इंटीग्रेशन देण्यात येईल.