Free Fire आणि PUBG राहिले मागे; ‘हा’ गेम मार्चमध्ये केला गेला सर्वात जास्त डाउनलोड
By सिद्धेश जाधव | Published: April 14, 2022 05:19 PM2022-04-14T17:19:05+5:302022-04-14T17:20:01+5:30
मोबाईल गेम्स कॅटेगरीचे मार्च 2022 चे आकडे समोर आले आहेत, लोकप्रिय गेम्स फ्री फायर आणि पबजीला प्रथम स्थान मिळालं नाही.
मार्च 2022 मधील मोबाईल गेम्सचे आकडे समोर आले आहेत. या यादीनुसार फेब्रवारी 2022 मध्ये तिसऱ्या क्रमकांवर असलेल्या गेमनं फ्री फायर आणि पबजी सारख्या दिग्गजांना मागे टाकलं आहे. Merge Master मोबाईल गेमची लोकप्रियता वाढण्यास सुरुवात झाली आहे. मार्चमध्ये हा गेम फ्री फायर आणि सबवे सर्फरला मागे टाकत टॉपला पोहोचला आहे.
सेन्सर टॉवरच्या रिपोर्टनुसार, मार्च 2022 मध्ये Merge Master जगातील सर्वाधिक डाउनलोड केला गेलेला मोबाईल गेम बनला आहे. या महिन्यात 28.3 मिलियन (2.83 कोटी) वेळा हा गेम डाउनलोड करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात भारतीयांच्या संख्या जास्त आहे. ज्या लोकांनी मार्च 2022 मध्ये Merge Master गेम आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केला आहे, त्यात 38 टक्के लोक भारतीय आहेत. यावरून या गेमच्या भारतातील लोकप्रियतेची माहिती मिळते.
Garena Free Fire गेमनं जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये पाहिलं स्थान मिळवलं होतं. परंतु 2022 मध्ये डाउनलोडच्या बाबतीत हा गेम दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तरीही मार्च 2021 च्या तुलनेत 41.8 टक्के जास्त डाउनलोडस गेमला मिळाले आहेत. हा गेल्या महिन्यात गेम 2.55 कोटी वेळा डाउनलोड केला गेला होता. यातील 35.5 टक्के डाउनलोड भारतातील आहेत.
मार्च 2022 मधील सर्वाधिक डाउनलोड करण्यात आलेले मोबाईल गेम्स:
- Merge Master
- Garena Free Fire
- Subway Surfers
- Army Commander
- Fill The Fridge
- Roblox
- Fishdom
- Ludo King
- PUBG Mobile
- Candy Crush Saga