कोणीही तुमच्या मेसेजचा स्क्रीनशॉट घेतल्यास मिळणार अलर्ट; Facebook वरील फेक अकाऊंट देखील सहज समजणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 05:30 PM2022-01-29T17:30:15+5:302022-01-29T17:30:55+5:30
मेसेंजरमध्ये एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन, स्क्रीनशॉट डिटेक्शन, मेसेज रिअॅक्शन, टायपिंग इंडिकेटर्स सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.
Facebook नं आपल्या मेसेंजर अॅपमध्ये मोठा बदल केला आहे. मेसेंजरमध्ये एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन, स्क्रीनशॉट डिटेक्शन, मेसेज रिअॅक्शन, टायपिंग इंडिकेटर्स सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. यातील ऑप्ट-इन एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड फिचर व्हॉट्सअॅप युजर्ससाठी नवीन नाही. परंतु स्क्रीनशॉट डिटेक्शन आणि मेसेज रिअॅक्शन फीचरची प्रतीक्षा व्हॉट्सअॅप युजर्सना देखील आहे.
एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन
एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनमध्ये चॅटची सुरक्षा आणि प्रायव्हसी कायम राहते. वर्षभर टेस्टिंग केल्यानंतर आता हे फिचर सादर करण्यात आलं आहे. या फिचरमुळे सेंडर आणि रिसिव्हर व्यतिरिक्त इतर कोणीही चाट वाचू शकणार नाही, अगदी फेसबुकही. व्हॉट्सअॅपवर हे फिचर खूप आधीपासूनच उपलब्ध आहे.
स्क्रीनशॉट डिटेक्शन फीचर
नव्या फीचर्स पैकी सर्वात खास फिचर म्हणजे 'स्क्रीनशॉट डिटेक्शन' फीचर. या फिचरमुळे डिसअपीयरिंग मेसेजचा स्क्रीनशॉट घेणाऱ्या युजर्सचा अलर्ट सेंडरला पाठवण्यात येईल. या फिचरची मागणी व्हॉट्सअॅपवर देखील युजर करत आहेत. तसेच व्हॉट्सअॅपवर सध्या टेस्ट करण्यात येत असलेले मेसेज रिअॅक्शन फीचर देखील मेसेंजरवर आलं आहे. ज्यात तुम्ही मेसेजवर टच अँड होल्ड करून रिअॅक्शन देऊ शकता. तसेच डबल टॅप करून "हार्ट" रिअॅक्ट करू शकता.
वेरिफाइड बॅज
एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड चॅटला एक वेरिफाइड बॅज देखील देण्यात येईल. त्यामुळे लोकांना ऑथेंटिक आणि फेक अकाऊंटमधील फरक सहज समजू शकेल. येत्या आठवड्यांमध्ये हे फीचर मेसेंजरवर रोल आउट करण्यात येईल.
हे देखील वाचा:
Fastrack ब्रँडचा ब्लड प्रेशर ट्रॅक करणारा Smartwatch लाँच; लवकर खरेदी केल्यास 2,000 रुपयांची सूट
स्मार्टफोनला कव्हर वापरताय? त्याचे तोटेही अनेक आहेत, समजल्यावर काढून टाकाल...