आता तुम्ही पैसे देऊन Insta-FB ची ब्लू टिक खरेदी करू शकता, जाणून घ्या किती रुपये मोजावे लागतील?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 08:08 AM2023-06-08T08:08:14+5:302023-06-08T08:15:16+5:30

तुम्हालाही मेटाच्या ब्लू सर्व्हिसचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला दरमहा किती पैसे द्यावे लागतील? याबद्दल जाणून घ्या...

meta verified subscription price company rolls out service after twitter blue | आता तुम्ही पैसे देऊन Insta-FB ची ब्लू टिक खरेदी करू शकता, जाणून घ्या किती रुपये मोजावे लागतील?

आता तुम्ही पैसे देऊन Insta-FB ची ब्लू टिक खरेदी करू शकता, जाणून घ्या किती रुपये मोजावे लागतील?

googlenewsNext

मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरच्या ब्लू सबस्क्रिप्शन सर्व्हिसप्रमाणेच आता इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटाने ( Meta) देखील भारतातील युजर्ससाठी व्हेरिफाइड सर्व्हिस सुरू केली आहे. तुम्हालाही मेटाच्या ब्लू सर्व्हिसचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला दरमहा किती पैसे द्यावे लागतील? याबद्दल जाणून घ्या...

मेटाने भारतीय युजर्ससाठी मासिक सबस्क्रिप्शनची किंमत 699 रुपये निश्चित केली आहे. दरम्यान, या किंमतीमध्ये तुम्हाला मोबाइल अॅप्सवर व्हेरिफाइड सर्व्हिसचा लाभ मिळणार आहे. तसेच, तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच पडत असेल की ही किंमत Android युजर्ससाठी आहे की iOS युजर्ससाठी?  तर ही किंमत Android आणि Apple iPhone युजर्ससाठी समान आहे.

कंपनी येत्या काही दिवसांत वेब युजर्ससाठी मोबाइल अॅपसाठी सुरू केलेली व्हेरिफाइड सर्व्हिस देखील रोलआउट करेल आणि वेब युजर्ससाठी व्हेरिफाइड सर्व्हिसची किंमत 599 रुपये प्रति महिना असणार आहे. दरम्यान, युजर्स इन्स्टाग्राम किंवा फेसबुक अॅपद्वारे थेट मेटा व्हेरिफाइड सर्व्हिस खरेदी करू शकतील. फेसबुक आणि इंस्टाग्राम युजर्स व्हेरिफाइड अकाउंट सब्सक्रिप्शन खरेदी करण्यासाठी सरकारी आयडी पुरावा द्यावा लागेल. व्हेरिफाइड सबस्क्रिप्शन घेणाऱ्या युजर्सना अकाउंट सपोर्टसह अनेक विशेष फीचर्सचा लाभ मिळेल. 

मेटाने युजर्ससाठी व्हेरिफाइड अकाऊंट सर्व्हिस सुरू केली आहे, पण यासोबतच अनेक प्रश्नही निर्माण होऊ लागले आहेत. जसे की ज्या फेसबुक आणि इंस्टाग्राम युजर्सकडे आधीच व्हेरिफाइड बॅज आहेत त्यांचे काय होणार? ज्यांच्याकडे आधीपासून व्हेरिफाइड बॅज आहेत, त्यांचे बॅज कंपनी काढून टाकेल आणि युजर्स दरमहा पैसे द्यावे लागतील किंवा आधीच व्हेरिफाइड केलेल्या अकाउंटवर कोणताही परिणाम होणार नाही. असे अनेक प्रश्न आहेत, परंतु याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.

Web Title: meta verified subscription price company rolls out service after twitter blue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.