नजर हटी, दुर्घटना घटी! सरकारची वॉर्निंग, एका कोडने हॅक होईल फोन; 'ही' चूक पडेल महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 12:02 PM2024-01-17T12:02:58+5:302024-01-17T12:03:43+5:30
गृह मंत्रालयाकडून एक अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा इशारा एका सायबर क्राईमबद्दल आहे, जो लोकांचं बँक अकाऊंट गुपचूपपणे रिकामं करत आहे.
सायबर फसवणुकीची रोज नवनवीन प्रकरणे वाचायला आणि ऐकायला मिळत आहेत. अशा फसवणुकीपासून सर्वसामान्य भारतीयांना वाचवण्यासाठी गृह मंत्रालयाकडून एक अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा इशारा एका सायबर क्राईमबद्दल आहे, जो लोकांचं बँक अकाऊंट गुपचूपपणे रिकामं करत आहे.
MHA च्या सायबर शाखेने सायबर क्रिमिनलची लेटेस्ट पद्धत पकडली आहे. सर्वसामान्यांना याची माहितीही नसते आणि त्यांचा बँक अकाऊंट बॅलेन्स अचानक शून्य होतो. यामध्ये हॅकर्स तुम्हाला हॅकिंगपासून मुक्त करण्याचं आश्वासन देतात, पण प्रत्यक्षात सायबर क्राईमची ही सुरुवात असते.
MHA ने सुचविलेल्या या पद्धतीमध्ये स्कॅमर्स सामान्य लोकांना कॉल करतात. मंत्रालयाने म्हटलं आहे की, जर कोणी म्हणत असेल की तुमचा फोन हॅक झाला आहे, तर आता फोन बंद केला जाईल आणि डायल करा *401#9818×××××6 (अनोळखी नंबर), तर सावध राहा. असं करणं तुमच्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं.
स्मार्टफोन युजर्सनी *401# डायल केल्यानंतर एखाद्याचा कॉन्टॅक्ट नंबर डायल केला तर तुमचे सर्व मेसेज आणि कॉल्स तुम्ही डायल केलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर जाण्यास सुरुवात होईल.
स्कॅमर्सना एकदा OTP (वन टाइम पासवर्ड) चा एक्सेस मिळाला की, ते तुमच्या बँक अकाऊंटमधील रक्कम देखील काढून टाकू शकतात. सायबर क्रिमिनल्स किंवा हॅकर्स देखील याच्या मदतीने तुमचे सीक्रेट्स कॉल ऐकू शकतात.
तुम्ही अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीला बळी पडल्यास, त्यापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही सायबर हेल्पलाइन नंबर 1930 वर कॉल करू शकता. यानंतर, तुमच्यासोबत घडलेली घटना सांगितल्यावर ते या संदर्भात मदत करतील.