लाँचपूर्वी Mi 11 Lite च्या रंगांची माहिती आली समोर; 22 जूनला सादर होईल हा सर्वात स्लिम स्मार्टफोन
By सिद्धेश जाधव | Published: June 19, 2021 05:18 PM2021-06-19T17:18:01+5:302021-06-19T17:19:25+5:30
Mi 11 Lite launch: 22 जूनला शाओमी Mi 11 Lite भारतात Jazz Blue, Tuscany Coral आणि Vinyl Black रंगांमध्ये लाँच करण्यात येईल.
22 जून रोजी शाओमी भारतात Mi 11 Lite सादर करणार आहे. लाँचपूर्वी कंपनीने या फोनच्या कलर ऑप्शन्सची माहिती दिली आहे. कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर अकॉउंटवरून हि माहिती दिली आहे. कंपनीने एका व्हिडीओच्या माध्यमातून फोनच्या बॅक पॅनलची डिजाईन देखील दाखवली आहे. हा फोन Jazz Blue, Tuscany Coral आणि Vinyl Black अश्या रंगांमध्ये सादर करण्यात येईल.
Mi 11 Lite भारतात 22 जून रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल. हा फोन फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. या फोनच्या किंमतीची अधिकृत माहिती कंपनीने दिली नाही. परंतु, हा फोन 25,000 रुपयांच्या आसपास भारतात लाँच केला जाईल, अशी चर्चा आहे. हा फोन यापूर्वी युरोपियन बाजारात लाँच झाल्यामुळे याचे स्पेसिफिकेशन्स सहज उपलब्ध झाले आहेत.
We're very excited to reveal 3 beautiful color variants of #Mi11Lite 😍
— Mi India (@XiaomiIndia) June 18, 2021
🟤 Tuscany Coral
🔵 Jazz Blue
⚫️ Vinyl Black
These colors are inspired by a region in Italy, a music genre & phonographic records
Tell us your favorite color
Launching 22nd June, 12PM#LiteAndLoadedpic.twitter.com/LYOVvFAFbY
Xiaomi Mi 11 Lite स्पेसिफिकेशन्स
Xiaomi Mi 11 Lite स्मार्टफोनचे दोन्ही 4G आणि 5G व्हेरिएंट्स 6.5-इंचाच्या FHD+ AMOLED पॅनलसह सादर केले गेले आहेत. या स्मार्टफोनच्या 4G व्हेरिएंट्सच्या डिस्प्लेमध्ये कंपनीने Corning Gorilla Glass 5 आणि 5G व्हेरिएंटमध्ये Gorilla Glass 6 ची सुरक्षा दिली आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये कंपनीने 4,200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्ज सपोर्टसह येते.
शाओमीच्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये एकसारखा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा मुख्य कॅमेरा 64MP सेंसर आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 5MP मॅक्रो सेंसर देण्यात आला आहे. Xiaomi Mi 11 Lite स्मार्टफोनच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. कंपनीने Xiaomi Mi 11 Lite 5G व्हेरिएंट्समध्ये 20MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
Xiaomi Mi 11 Lite 4G व्हेरिएंट्स कंपनीने Qualcomm Snapdragon 732G चिपसेटसह सादर केला आहे. तर, Xiaomi Mi 11 Lite 5G स्मार्टफोन कंपनीने Snapdragon 780G चिपसेटसह सादर केला आहे. दोन्ही स्मार्टफोन 8GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतच्या स्टोरेजसह सादर केले गेले आहेत. AMOLED पॅनलसह शाओमीच्या या दोन्ही व्हेरिएंट्समध्ये कंपनीने साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.