22 जूनला लाँच होईल भारतातील सर्वात हलका आणि स्लिम फोन Mi 11 Lite; किंमत देखील आली समोर
By सिद्धेश जाधव | Published: June 9, 2021 03:38 PM2021-06-09T15:38:14+5:302021-06-09T15:40:24+5:30
Mi 11 Lite Launch: मी इंडियाने ऑफिशियल ट्विटर हँडलवरून ट्विट करून माहिती दिली आहे कि, कंपनी 22 जूनला भारतातील सर्वात हलका आणि सर्वात स्लिम फोन मी 11 लाइट सादर करेल.
Xiaomi ने यावर्षी मार्चमध्ये चीनमध्ये Mi 11 Lite 4G आणि 5G व्हर्जनमध्ये लाँच केला होता. आता कंपनीना हा फोन भारतात लाँच करण्याची तयारी सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी टीज केल्यानंतर आता कंपनीने सांगितले आहे कि, 22 जूनला भारतात मी 11 लाइट लाँच केला जाईल. हा फोन भारतातील सर्वात स्लिम आणि हलका फोन असेल, असा कंपनीने दावा केला आहे. (Mi 11 Lite will launch in India on June 22 company confirmed date)
मी इंडियाने ऑफिशियल ट्विटर हँडलवरून ट्विट करून माहिती दिली आहे कि, कंपनी 22 जूनला भारतातील सर्वात हलका आणि सर्वात स्लिम फोन मी 11 लाइट सादर करेल. विशेष म्हणजे, प्रसिद्ध टिप्स्टर ईशान अग्रवालने यावर्षीच्या सुरुवातीलाच सांगितले होते कि, एमआय 11 लाइट भारतात 3 व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. इंडिया टुडेने अलीकडेच एका रिपोर्टमध्ये सांगितले होते कि Xiaomi Mi 11 Lite 4G व्हेरिएंटची किंमत भारतात 25000 रुपयांच्या आसपास असेल.
The wait is over!
— Mi India (@XiaomiIndia) June 9, 2021
The 𝑠𝑙𝑖𝑚𝑚𝑒𝑠𝑡, the 𝑙𝑖𝑔ℎ𝑡𝑒𝑠𝑡 and the most 𝐥𝐨𝐚𝐝𝐞𝐝 smartphone of 2021 is here! 🪶💪#Mi11Lite marks its India debut at 12 noon on June 22nd.
We are super excited. Are you?
RT 🔁 using #LiteAndLoaded and spread the word. pic.twitter.com/SfC3WledHQ
Xiaomi Mi 11 Lite स्पेसिफिकेशन्स
Xiaomi Mi 11 Lite स्मार्टफोनचे दोन्ही 4G आणि 5G व्हेरिएंट्स 6.5-इंचाच्या FHD+ AMOLED पॅनलसह सादर केले गेले आहेत. या स्मार्टफोनच्या 4G व्हेरिएंट्सच्या डिस्प्लेमध्ये कंपनीने Corning Gorilla Glass 5 आणि 5G व्हेरिएंटमध्ये Gorilla Glass 6 ची सुरक्षा दिली आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये कंपनीने 4,200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्ज सपोर्टसह येते.
शाओमीच्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये एकसारखा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा मुख्य कॅमेरा 64MP सेंसर आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 5MP मॅक्रो सेंसर देण्यात आला आहे. Xiaomi Mi 11 Lite स्मार्टफोनच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. कंपनीने Xiaomi Mi 11 Lite 5G व्हेरिएंट्समध्ये 20MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
Xiaomi Mi 11 Lite 4G व्हेरिएंट्स कंपनीने Qualcomm Snapdragon 732G चिपसेटसह सादर केला आहे. तर, Xiaomi Mi 11 Lite 5G स्मार्टफोन कंपनीने Snapdragon 780G चिपसेटसह सादर केला आहे. दोन्ही स्मार्टफोन 8GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतच्या स्टोरेजसह सादर केले गेले आहेत. AMOLED पॅनलसह शाओमीच्या या दोन्ही व्हेरिएंट्समध्ये कंपनीने साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.