शाओमीचा नवीन दमदार स्मार्टफोन लवकरच होईल लाँच; Mi Mix 4 चे स्पेसिफिकेशन्स आले समोर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 12:15 PM2021-06-19T12:15:18+5:302021-06-19T12:16:42+5:30

Mi Mix 4 leak: Mi Mix 4 यावर्षी लाँच केला जाईल, यात स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर आणि 120W फास्ट चार्जिंग असे स्पेसिफिकेशन्स देण्यात येतील.  

Mi mix 4 leak reveals specification expected price specs  | शाओमीचा नवीन दमदार स्मार्टफोन लवकरच होईल लाँच; Mi Mix 4 चे स्पेसिफिकेशन्स आले समोर 

हा फोटो Mi Mix 3 चा आहे.

Next

शाओमी यावर्षीही Mi Mix 4 लाँच करेल, अशी माहिती गेले कित्येक दिवस समोर येत आहे. यावर्षीच्या सुरुवातीला कंपनीचे सीईओ Lei Jun यांनी या स्मार्टफोनची झलक दाखवली होती. त्यानंतर विबोवर देखील या स्मार्टफोनची माहिती समोर आली होती. आता एका नवीन वीबो लीकमधून शाओमीच्या एमआय मिक्स 4 चे मुख्य स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. (Xiaomi Mi Mix 4 will come with snapdragon 888 and 120w fast charging) 

Mi MiX 4 चे स्पेसिफिकेशन 

Mi MiX 4 मध्ये 2K+ स्क्रीन रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले पॅनल असेल. तसेच या डिस्प्लेमध्ये अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेरा देण्यात येईल. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर, 4,500mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग असेल. Mi मिक्स 4 च्या लाँचच्या वेळी या फीचर्समध्ये बदल होऊ शकतो.  

शाओमीच्या सीईओनी सांगितले होते कि मी मिक्स 4 यावर्षी लाँच केला जाईल, परंतु हा कधीपर्यंत लाँच केला जाईल याची माहिती मात्र देण्यात आली नाही.  या फोनच्या किंमतीबाबत एका युजरने विबोवर पोस्ट केली आहे कि या स्मार्टफोनची किंमत Xiaomi Mi 11 Ultra पेक्षा जास्त असेल. मी 11 अल्ट्रा हा सध्या शाओमीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे, ज्याची किंमत 70,000 रुपयांच्या आसपास आहे.  

Web Title: Mi mix 4 leak reveals specification expected price specs 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.