Xiaomi ने भारतात लाँच केला पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर आणि नेकबँड ईयरफोन, जाणून घ्या किंमत अन् कमाल फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 03:05 PM2021-02-23T15:05:42+5:302021-02-23T15:05:48+5:30

Mi Portable Bluetooth Speaker And Mi Neckband Bluetooth Earphone Pro : शाओमीचे हे नवीन प्रोडक्ट मी ब्रँड अंतर्गत बाजारात उतरवले आहे. प्रीमियम फीचर्स आणि डिझाइन सोबत लाँच करण्यात आले आहे.

mi neckband bluetooth earphone pro and mi portable bluetooth speaker launched by xiaomi know price | Xiaomi ने भारतात लाँच केला पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर आणि नेकबँड ईयरफोन, जाणून घ्या किंमत अन् कमाल फीचर्स

Xiaomi ने भारतात लाँच केला पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर आणि नेकबँड ईयरफोन, जाणून घ्या किंमत अन् कमाल फीचर्स

googlenewsNext

नवी दिल्ली - Xiaomi ने भारतातील ग्राहकांसाठी Mi Portable Bluetooth Speaker (16 वॉट) आणि Mi Neckband Bluetooth Earphone Pro ला लाँच केलं आहे. मी वायरलेस नेकबँड ईयरफोनमध्ये अ‍ॅक्टिव्ह नॉईस कॅन्सिलेशन फीचर दिले आहे. तर दुसरीकडे वायरलेस स्पीकरमध्ये दोन ड्रायव्हर सेटअप दिले आहे. जे 16 वॉट आउटपूट देते. याला वॉटर रेसिस्टेंटसाठी IPX7 रेटिंग प्राप्त आहे. शाओमीचे हे नवीन प्रोडक्ट मी ब्रँड अंतर्गत बाजारात उतरवले आहे. प्रीमियम फीचर्स आणि डिझाइन सोबत लाँच करण्यात आले आहे.

Mi Portable Bluetooth Speaker (16W) आणि Mi Neckband Bluetooth Earphone Pro ची भारतातील किंमत अनुक्रमे  2,499 रुपये आणि 1,799 रुपये आहे. हे ब्लूटूथ ईयरफोन्स सर्वात स्वस्त वायरेल हेडसेट आहे. जे एएनसी (ANC) फीचर्ससोबत येतात. ब्लूटूथ स्पीकरमध्ये प्रीमियम फीचर्ससोबत वेगवान आवाज देण्यात येत आहे. दोन्ही डिव्हाईसला शाओमीच्या अधिकृत वेबसाइटवरून तसेच मी डॉट कॉमवरून खरेदी करता येऊ शकतं.

Mi Neckband Bluetooth Earphone Pro फीचर्स

मी नेकबँड ब्लूटूथ ईयरफोन प्रो व्हर्जनमध्ये 2019 मध्ये 1,599 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेल्या मी नेकबँड ब्लूटूथ ईयरफोनच्या तुलनेत जास्त फीचर्स देण्यात आले आहे. केवळ 200 रुपयांच्या जास्त किंमतीत शाओमीने एएनसी सपोर्ट दिला आहे. सोबत हेडसेटमध्ये काही इंप्रूव्हमेंट सुद्धा दिले आहेत. ब्लूटूथ कोडेक सपोर्ट आणि वॉटर रेसिस्टेंटसाठी IPX5 रेटिंग दिली आहे. चार्जिंगसाठी मायक्रो यूएसबी पोर्ट दिले आहे. लेटेस्ट ईयरफोन्स सिंगल चार्जवर 20 तास बॅटरी लाइफ देते. ईयरफोन्स 10 एमएम डायनामिक ड्रायव्हर्स सोबत येते. याशिवाय, प्लेबॅक, व्हॅल्यूमला कंट्रोल करण्यासाठी ईयरफोन्समध्ये बटण दिले आहे.

Mi Portable Bluetooth Speaker (16W) फीचर्स

नावापरूनच हे 16 वॉट आऊटपूट दोन 8 वॉटचे फुल रेंज ड्रायव्हर्ससाठी देते. स्पीकर सुद्धा वॉटर रेसिस्टेंट साठी IPX7 रेटिंग सोबत येतात. याशिवाय या डिव्हाईसमध्ये ग्राहकांसाठी स्टिरियो पेयरिंग मोड सुद्धा मिळणार आहे. या ब्लूटूथ स्पीकरमध्ये ड्यूअल equaliser मोड्स सुद्धा मिळणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

दमदार! Vivo चा लवकरच मोठा धमाका, भारतात एक-दोन नव्हे तर तब्बल 11 स्मार्टफोन्स करणार लाँच

हँडसेट निर्माता कंपनी विवो (Vivo) भारतातील ग्राहकांसाठी एक दोन नव्हे तर तब्बल 11 स्मार्टफोन लाँच करणार आहे. यामध्ये फ्लॅगशीप Vivo X60 series आणि Vivo X50+ स्मार्टफोन्स पुढच्या महिन्यात लाँच करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मायस्मार्ट प्राइसच्या रिपोर्टनुसार, विवो पुढील महिन्यात मार्चच्या अखेरपर्यंत किंवा एप्रिलच्या सुरुवातीला आपली Vivo X60 series ला लाँच करणार आहे. या सीरीज अंतर्गत Vivo X60, Vivo X60 Pro आणि Vivo X60 Pro+ स्मार्टफोनला बाजारात आणू शकते. विवोने एक्स 60 आणि एक्स 60 प्रो स्मार्टफोनला डिसेंबरमध्ये बाजारात आले होते. तर एक्स 60 प्रो प्लस स्मार्टफोनला जानेवारीत चीनच्या मार्केटमध्ये आले होते. विवो कंपनीने आपल्या Vivo X60 Pro+ स्मार्टफोनला Snapdragon 888 पॉवर्ड प्रोसेसर सोबत बाजारात आणलं होतं. 

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

Web Title: mi neckband bluetooth earphone pro and mi portable bluetooth speaker launched by xiaomi know price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.