एमआय नोट 10, 10 प्रो लाँच; मिळणार 108 मेगापिक्सलचा कॅमेरा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 10:18 PM2019-11-06T22:18:06+5:302019-11-06T22:18:58+5:30
शाओमीने एमआय नोट 10 सिरिज लाँच केली आहे.
कमी काळात आघाडीची स्मार्टफोन कंपनी बनलेल्या शाओमीने एमआय नोट 10 सिरिज लाँच केली आहे. यामध्ये नोट 10, 10 प्रो हे दोन फोन आहेत. आज हे फोन स्पेनमध्ये लाँच करण्यात आले. गेल्या आठवड्यात कंपनीने एका कार्यक्रमात हे फोन दाखविले होते. या फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा पेंटा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, वॉटरड्रॉप नॉच ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय एमआय नोट 10 सिरीजच्या दोन्ही मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगन 730 जी प्रोसेसर आणि 5260 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच फोनमध्ये 8 जीबीची रॅम आणि 256 जीबीचे स्टोरेज देण्यात आले आहे.
नोट 10 मध्ये 6 जीबी/128 जीबी मेमरी देण्यात आली आहे. याची किंमत 43200 रुपये आहे. तर नोट 10 प्रोला 8 जीबी/256 जीबी मेमरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत 51000 रुपये आहे. दोन्ही मॉडेल ग्लेशियर व्हाइट, ऑरोरा ग्रीन, मिडनाइट ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहेत.
दोन्ही फोनमध्ये स्पेसिफिकेशन बहुतांश सारखीच आहेत. पण नोट 10 मध्ये 7P लेंस आणि नोट 10 प्रो 8P लेन्स देण्यात आली आहे. 5x ऑप्टिकल झूम, 10x हाइब्रिड झूम, 50x डिजिटल झूमची सुविधा मिळणार आहे. 30 वॉटचा चार्जर फोन 65 मिनिटांमध्ये चार्ज करणार आहे.
डिस्प्ले
6.47 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. 1080x2340 रिझोल्युशन आहे.
कॅमेरा
108MP(प्राइमरी सेंसर)+20MP(117 डिग्री वाइड-अँगल)+12MP(शॉर्ट टेलिफोटो लेंस विथ 2x जूम)+5MP(टेलिफोटो लेंस)+ 2MP मायक्रो कॅमेरा) देण्यात आला आहे. तर पुढे 32MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.