Mi Super Sale 2020 : Redmi 8A सह 'या' स्मार्टफोन्सवर दमदार ऑफर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 10:59 AM2020-02-10T10:59:47+5:302020-02-10T11:17:23+5:30
Redmi Mobile Phones Offer : चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने भारतीय बाजारात चांगलाच जम बसविला आहे.
नवी दिल्ली - चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने भारतीय बाजारात चांगलाच जम बसविला आहे. Xiaomi चे फोन भारतात सर्वाधिक विकले गेले आहेत. शाओमीने Mi Super Sale चे आयोजन केलं आहे. हा सेल 8 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. शाओमीने आपल्या युजर्ससाठी दमदार ऑफर्स आणल्या आहेत. 16 फेब्रुवारीपर्यंत हा सेल सुरू असणार आहे. या सेलमध्ये शाओमीच्या Redmi 8A सह अनेक स्मार्टफोनवर दमदार ऑफर्स देण्यात आल्या आहेत.
शाओमी रेडमी 8 ए या फोनवर Mi Super Sale मध्ये तब्बल 2000 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. 7,999 रुपयांऐवजी 6,499 रुपयांमध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच कार्डचा वापर केल्यास ग्राहकांनी आणखी सूट मिळणार आहे. खरेदीसाठी ICICI क्रेडिट कार्डचा वापर केला तर 5% की इंस्टंट डिस्काउंट मिळणार आहे. या फोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजसाठी 6,999 रुपये (एमआरपी 8, 999) मोजावे लागणार आहेत.
रेडमी 8 ए हा फोन Midnight Black, Ocean Blue आणि Sunset Red अशा तीन रंगात उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये 6.22 इंचाचा डॉट नॉच डिस्प्ले देण्यात आला असून 5000 mAh क्षमतेची बॅटरी असलेला हा फोन आहे, तसेच 'स्मार्ट देश का दमदार स्मार्टफोन' असं देखील या फोनला म्हटलं जातं. फोनमध्ये फ्रंट कॅमेरा हा 8MP क्षमतेचा आहे. तर फोनच्या मागच्या बाजूला 12 मेगापिक्सल क्षमतेचा Sony IMX 363 सेन्सर देण्यात आला आहे.
Xiaomi ने काही दिवसांपूर्वी भारतात स्वस्तातला स्मार्टफोन Redmi 7A लाँच केला होता. या फोनची सुरुवातीची किंमत 5999 रुपयांपासून असून 2GB रॅम आणि 16GB स्टोरेजच्या व्हेरिअंटची ही किंमत आहे. सेलमध्ये Redmi 7A वर तब्बल 3000 पर्यंत सूट देण्यात येत आहे. Redmi 7A या स्मार्टफोनला 5.45 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझोल्यूशन 720 x 1440 पिक्सल आहे. यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. तर वेगळा मायक्रो एसडी कार्ड देण्यात आला आहे. याद्वारे 256 जीबीपर्यंत वाढविण्यात येते.
शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये 10 वॅट चार्जिंगसोबत 4 हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ही बॅटरी 17 दिवस स्टँडबाय येऊ शकते. रेडमीच्या स्वस्तातल्या फोनमध्ये सोनीचा 12 मेगापिक्सलचा सेन्सर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा एआय ब्युटी मोड देण्यात आला आहे. रेडमी 7ए मध्ये ड्युअल नॅनो सिम स्लॉट देण्यात आला आहे. या स्मार्टफोन 3.5 एमएमचा हेडफोन जॅक दिलेलेा आहे. तसेच हा फोन ब्ल्यूटूथ 5.0 सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये वायरलेस एफएम रेडिओ देण्यात आला आहे.
Redmi Note 7 Pro, Redmi K20, Redmi Note 8 Pro, Redmi Note 8, Redmi K20 Pro, Redmi Go, Redmi Y3, Redmi Note 7S, Redmi 7 या फोन्सवर दमदार ऑफर्स देण्यात आल्या आहेत. तसेच 2000 ते 6000 पर्यंत सूट देण्यात आली आहे. गॅजेट्सवर भन्नाट ऑफर्स देण्यात आल्या आहेत. रेडमी वाय 3 वर 4000 पर्यंत सूट देण्यात आली आहे. 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 7, 999 रुपयांना (एमआरपी - 11, 999) मिळत आहे. तसेच रेडमी 8 ए सारखंच फोनच्या खरेदीसाठी ICICI क्रेडिट कार्डचा वापर केला तर 5% की इंस्टंट डिस्काउंट मिळणार आहे.
Xiaomi घेऊन येत आहे... तब्बल 7 पॉपअप कॅमेरांचा स्मार्टफोन
स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये सध्या ड्यूअल, ट्रिपल आणि क्वाड रिअर कॅमेराचे स्मार्टफोनची चलती आहे. मोबाईल निर्मात्या कंपन्या काहीतरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात नेहमीच असतात. अगदी 10-15 दिवसांनी बाजारात नवा स्मार्टफोन आणला जात आहे. यामुळे ग्राहकांनाही याच काळात त्यांचा नवा मोबाईल जुना झाल्यासारखे वाटते. आता 108 मेगापिक्सलच्या फोनची चर्चा असताना शाओमीने तब्बल 7 कॅमेऱ्यांचा पॉपअप पेटंटसाठी अर्ज केला आहे. पेटंटमध्ये देण्यात आलेल्या फोटोमध्ये नव्या स्मार्टफोनमध्ये सात कॅमेरे दिसत आहेत. मात्र, या फोनचे नाव आणि अन्य फिचर्सबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
'या' बातम्या ही नक्की वाचा
WhatsApp ला हॅकिंगचा धोका; त्वरित अॅक्टिव्हेट करा 'हे' सिक्यॉरिटी फीचर्स
WhatsApp वरच्या सीक्रेट गोष्टी Gmail वर करता येतात सेव्ह, कसं ते जाणून घ्या
China Coronavirus : कोरोना व्हायरसमुळे Apple चं मोठं नुकसान; जाणून घ्या कसं
Google Payमध्ये आला नवा बग, आपोआप डिलीट होतायत बँक खाती
Facebook वरून डिलीट करा ब्राऊजिंग हिस्ट्री; कसं ते जाणून घ्या
महत्त्वाच्या बातम्या
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी
'मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा, जिवंत जाळा', पीडितेच्या वडिलांचा संताप
हिंगणघाट जळीत प्रकरणामधील पीडितेचा मृत्यू नव्हे, तर खून- सुप्रिया सुळे
चीनमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे बळी ८१३ वर