4K डिस्प्ले असलेला Xiaomi Mi TV Q1 लाँच; डॉल्बी ऑडियोसह मिळणार अनेक फीचर्स
By जयदीप दाभोळकर | Published: February 9, 2021 04:25 PM2021-02-09T16:25:35+5:302021-02-09T16:34:35+5:30
Xiaomi TV Launched : पाहा किती आहे किंमत आणि कोणते आहेत विशेष फीचर्स
Xiaomi नं सोमवारी आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन Mi 11 सोबतच Mi TV Q1 हा 75 इंचाचा टीव्हीदेखील लाँच केला. अँड्रॉईड 10 ओएसवर चालण्याऱ्या शाओमीच्या या नव्या टीव्हीमध्ये QLED 4K डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीनं या टीव्हीची किंमत 1,299 युरो म्हणजेच जवळपास 1 लाख 14 हजार 300 रूपये इतकी ठेली आहे. या टीव्हीची एक खास बाब म्हणजे हा टीव्ही 7 लाख मुव्ही आणि टीव्ही शोंसह येतो. याव्यतिरिक्त टीव्हीमध्ये प्ले स्टोअरद्वारे 5 हजारांपेक्षा अधिक अॅप्स अॅक्सेस करता येऊ शकतात.
शाओमीच्या या टीव्हीमध्ये 3840x2160 पिक्सल रेझॉल्यूशन सोबत 75 इंचचा QLED 4K UHD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा टीवी विशेष अशा क्वॉन्टम डॉट टेक्नॉलॉजी सोबत येतो. यामध्ये उत्तम पिक्चर क्वालिटीसाठी 120Hz च्या रिफ्रेश रेटसह एकदम कमी बेझल्स देण्यात आले आहेत. तसंच 1.07 बिलिअन कलर व्हेरिअशनसह 100 टक्के NTSC रेंज, 1,024 निरनिराळे कलर शेड आणि 10000:1 चा कॉन्ट्रास्ट रेशो मिळतो. टीवीच्या डिस्प्लेचा व्ह्युविंग अँगल 178 डिग्री आहे.
काय आहेत स्पेसिफिकेशन्स ?
जबरदस्त आवाजासाठी या टीव्हीमध्ये सहा स्पीकर्स देण्यात आले आहे. तसंच यात 30W ची स्टिरिओ स्पीकर सिस्टमही देण्यात आलीआहे. यामध्ये चार वूफर्सदेखील आहेच. याव्यतिरिक्त टीव्हीला डॉल्बी ऑडिओ आणि डीटीएस एचडी सपोर्टही देण्यात आला आहे. कनेक्टिव्हीटीसाठी या टीव्हीमध्ये एक HDMI 2.1 पोर्ट, दोन HDMI 2.0 पोर्ट, दोन USB 2.0 पोर्ट, ड्यूल बँड वायफाय, ब्लूटूथ 5.0 आणि 3.5mm जॅक देण्यात आला आहे. याशिवाय आणखी अनेक ऑप्शन्स देण्यात आले आहे. गेमिंग आणि व्हिडीओ स्ट्रिमिंगसाठी या टीव्हीमध्ये लेटेन्सी मोडदेखील आहे. शाओमीचा हा प्रिमिअम टीव्ही बिल्टइन मायक्रोफोन आणि क्रोमकास्टसोबत येतो. याव्यतिरिक्त यात गुगल असिस्टंट आणि अॅमेझॉन अॅलेक्साचाही सपोर्ट आहे.