हार्ट रेट आणि SpO2 मॉनिटरिंगसह लाँच झाला Mi Watch Revolve Active; मिळणार 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप
By सिद्धेश जाधव | Published: June 22, 2021 02:51 PM2021-06-22T14:51:13+5:302021-06-22T14:51:54+5:30
Mi Watch Revolve Active: Mi Watch Revolve Active ची किंमत कंपनीने 9,999 रुपये ठेवली आहे, हा स्मार्टवॉच अमेझॉन मी.कॉम आणि मी होम स्टोर्समधून 25 जूनपासून विकत घेता येईल
शाओमीने आज भारतात Mi 11 सीरिजमध्ये नवीन Mi 11 Lite स्मार्टफोन लाँच केला आहे, या स्मार्टफोनसोबत कंपनीने नवीन जेनरेशनचा स्मार्टवॉच देखील सादर केला आहे. कंपनीने भारतात Mi Watch Revolve Active लाँच केला आहे. या स्मार्टवॉचमध्ये अल्वेज ऑन डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात बिल्ट-इन अॅलेक्सा सपोर्ट मिळतो. या वॉटर रेसिस्टन्स स्मार्टवॉचमध्ये 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळतो.
Mi Watch Revolve Active ची किंमत
Mi Watch Revolve Active ची किंमत कंपनीने 9,999 रुपये ठेवली आहे, हा स्मार्टवॉच अमेझॉन मी.कॉम आणि मी होम स्टोर्समधून 25 जूनपासून विकत घेता येईल. हा स्मार्टवॉच Black, Beige आणि Navy रंगात उपलब्ध होईल.
कंपनीने सादर केलेल्या अर्ली बर्ड ऑफरमध्ये Mi Watch Revolve Active फक्त 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच HDFC बँक कार्डधारकांना 750 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट देण्यात येईल.
Mi Watch Revolve Active चे स्पेसिफिकेशन्स
Mi Watch Revolve Active मध्ये 1.39-इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 454x454 पिक्सेल आहे. ब्लूटूथ 5.0 सपोर्ट असणारा हा वॉच अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हींसोबत वापरता येईल.
शाओमीच्या या स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट आणि SpO2 मॉनिटर देण्यात आला आहे. हा वॉच तुमच्या झोप तसेच फिटनेसचा देखील ट्रॅक करतो. या वॉचमध्ये 17 प्रोफेशनल तर 100 एक्सटेंडेड स्पोर्ट्स मोड्स देण्यात आले आहेत.
हा स्मार्टवॉच 50 मीटरपर्यंत वॉटर रेसिस्टंससह येतो. तसेच यातील अॅलेक्साच्या मदतीने स्मार्ट डिवाइस कंट्रोल करता येतात. तुम्ही म्युजिक आणि कॅमेरा देखील या स्मार्टवॉचने कंट्रोल करू शकता.